मित्राकडून पैसे उधारी घेतले; त्यावरून झालेल्या वादाचा शेवट धक्कादायक

नांदोराटोली येथे तरुणाच्या खुनानंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तब्बल दीडशे फुटापर्यंत फरफटत नेल्याचे घटनास्थळाची पाहणी केल्यावर समोर आले.

मित्राकडून पैसे उधारी घेतले; त्यावरून झालेल्या वादाचा शेवट धक्कादायक
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 8:41 AM

भंडारा : शहापूरजवळील नांदोरा टोली येथे रक्ताचा सडा पडला होता. तिथून दीडशे किलोमीटरवर मृतदेह फटफटत नेला होता. जवाहरनगर पोलिसांनी याचा सुगावा लावला. घटनास्थळावरून जवळचं टोली आहे. शहापूरच्या पोलीस पाटील यांनी तक्रार नोंदवली. पोलीस अधीक्षक घटनास्थळी गेले. आरोपी खून करून पसार झाले होते. संशयावरून एकाला ताब्यात घेण्यात आले. उधारीच्या पैशाच्या वादातून ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या एक आरोपी सापडला तरी यात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे.

तरुणाचा खून

भंडारा तालुक्यातील नांदोरा टोली (हेटी) येथे एका 35 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करीत खून करण्यात आला. धारगाव येथील जीशान मोहम्मद शेखरा यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

दीडशे फूट फरफटत नेला मृतदेह

जीशान मोहम्मद शेखरा याच्या हत्येची घटना बुधवारी रात्री घडली असावी, असा अंदाज आहे. गुरुवारी सकाळी ही बाब उघडकीला आली. नांदोराटोली येथे तरुणाच्या खुनानंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तब्बल दीडशे फुटापर्यंत फरफटत नेल्याचे घटनास्थळाची पाहणी केल्यावर समोर आले. पायातील जोडे, खिशातील पैसे, अंगावरील कपडे जसेच्या तसेच होते.

डोक्यावर शस्त्राने वार

डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळल्या. हा खुनाचा प्रकार असल्याचे सकाळी स्थानिक नागरिकांचा लक्षात आले. याची माहिती लगेच जवाहरनगर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळाहून रक्ताचे आणि मातीचे नमुने गोळा करण्यात आले. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.

संशयावरून पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. उसणवारीच्या पैशातून जीशानचा खून झाला. तसेच या कृत्यात एकापेक्षा अधिक आरोपी राहण्याचा अंदाज येत आहे.  उधारीचे पैसे आजचे उद्या झाले असते. पण, वाद जोरात झाला. तो असे घातक वळण घेईल, असं वाटलं नव्हतं. पण, शेवटी होत्याचं नव्हतं झालं. एका तरुणाचा जीव गेला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.