जंगलातला माकड शहरातल्या हॉटेलात, हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल हे काय?
काही वानरं आपली तृष्णा भागवतात. तर काही नाश्त्यावर ताव मारतात. असाच एक वानर भंडारा शहर वासियांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.
![जंगलातला माकड शहरातल्या हॉटेलात, हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल हे काय? जंगलातला माकड शहरातल्या हॉटेलात, हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल हे काय?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/01015453/monkey-1-n-.jpg?w=1280)
तेजस मोहतुरे, प्रतिनिधी, भंडारा : माकडांचा बंदोबस्त कसा लावायचा. हा मोठा गहन प्रश्न आहे. कारण तो केव्हा कुठून उड्या मारेल काही सांगता येत नाही. साकोली तालुक्यातील आतेगाव हा जंगल परिसर या परिसरात वन्य प्राण्यांचा मोठा उपद्रव आहे. बंदर येतात. शेतातील आंबे खातात. निघून जातात. वनविभागाचे अधिकारी म्हणतात, तक्रार करा. नुकसान भरपाई देऊ. पण, प्रत्येक्षात तसे काही होत नाही.
ब्रास सिटीत बंदरांचा कडप
भंडाऱ्यातील ब्रास सिटीत बंदरांचा कडप आला. त्याने नासधूस केली. तो निघून गेला. माकडांमुळे नागरिक परेशान आहेत. पण, त्यावर काही ठोस उपाय सापडत नाही. पण, याहून कहर करणारी अशी एक घटना उघडकीस आली आहे.
वानराचा शहरातल्या हॉटेलात नाश्ता करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल pic.twitter.com/BGSJlFGWiI
— Govind Hatwar (@GovindHatwar) May 31, 2023
माकडं जंगल सोडून शहरात पाण्यासाठी
सर्वत्र वातावरण उष्ण झालंय. चारा आणि पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे याचा फटका जंगलात तसेच आजूबाजूचा परिसरात वावरणाऱ्या वानरांनादेखील बसत आहे. त्यामुळे यातील काही वानरे आपला कळप सोडून शहरात मिळेल त्याठिकाणी ठाण मांडतात.
हॉटेलात नाश्यावर ताव मारताना माकड
काही वानरं आपली तृष्णा भागवतात. तर काही नाश्त्यावर ताव मारतात. असाच एक वानर भंडारा शहर वासियांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. तो थेट वानर हॉटेलात येऊन टेबलवर बसत नाश्त्यावर ताव मारताना दिसत आहे. या वानराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हॉटेल मालक बबन पंचभाई म्हणाले, हा वानर या भागात कधी-कधी येत असतो. त्याला काही जणांनी व्हिडीओ काढला. त्यावेळी तो नाश्ता करता होता. नाश्ता करणारा बंदर पाहून निघून गेला. त्यानंतर त्या नाश्त्यावर माकडाने ताव मारला. यथेच्छ ताव मारल्यानंतर त्याने तिथून काढता पाय घेतला.