तेजस मोहतुरे
भंडारा : ऐन पन्नासित आपले शरीर मजबूत ठेवत एका व्यक्तीने 2550 पुश अप काढले. असं आम्ही सांगितलं तर तुम्हाला विश्वास होईल का? पण हे खरं आहे. आपल्या जीवनाचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचे (Golden Jubilee Year) औचित्य साधत एका युवकानं हा विक्रम केलाय. भंडारा शहरातील (Bhandara City) लिम्का बुक आँफ वर्ल्ड रेकॉर्ड (Limca Book of World Records) विजेते पुरुषोत्तम चौधरी यांनी नवीन रेकॉर्ड बनविण्याचा प्रयत्न केला. दीड तासात तब्बल 2550 पुश अप काढले. जिद्द आणि चिकाटी असले की माणूस काही ही करू शकतोय. असाच एक काहीसा प्रकार भंडाराकरांनी अनुभवला.
भंडारा शहरातील पुरुषोत्तम चौधरी यांना लहानपणापासूनच पुशअप काढण्याची आवड होती. आपले शरीर मजबूत आणि तंदुरुस्त कस राहील, यासाठी ते नेहमी दैनंदिन जीवनात व्यायाम व पुश अप काढतात. हीच आवड त्यांनी पुढं नेत लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा विक्रम मिळविण्यास सहाय्यक ठरली. त्यांनी आता गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आपलं नाव कसं कोरता येईल, यासाठी प्रयत्न सुरु ठेवलाय.
भंडाऱ्यातील 50 वर्षीय पुरुषोत्तम चौधरी यांनी दीड तासात मारले 2550 पुश अप. pic.twitter.com/RjE6C1lsRa
— Govind Hatwar (@GovindHatwar) March 25, 2022
अखेर आपल्या 50 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भंडारा शहरातील प्रसिद्ध बहिरंगेश्वर व्यायमशाळेत आपल्या जीवनाचे सुवर्ण महोत्सव आगळा वेगळा पध्दतीने साजरा केला. त्यांनी दीड तासात तब्बल 2550 पुश अप काढले. यावेळी पुरुषोत्तम सारखे प्रतिभावान खेळाडू तयार होण्यासाठी शासनाने मदत करण्याची मागणी माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली. शेवटी पुरुषोत्तम या वयात 2550 पेक्षा अधिक पुश अप काढण्याच्या प्रयत्नाने युवक भारावून गेले.
Video | आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी? Raju Shetti म्हणतात, पक्षात सक्रिय नाही