Alcohol Dinker Cock : दारूडा कोंबडा, रम, व्हिस्की, बिअर, वोडका याला सगळं चालतंय, हा तर दारूशिवाय पाणीच पित नाही
या मालकाने कोंबड्याचा आजार घालवण्यासाठी दुसऱ्याच्या सागण्यावरून या कोंबड्याला दारू पाजली, मात्र आता आता सराईत बेवडा (Alcoholism) होऊन बसलाय. मात्र त्याच्या या पेताडपणामुळे मालकाचा खिसा रोज रिकाम होऊ लागला आहे.
भंडारा : आज पर्यंत तुम्ही माणसांना दारूचे व्यसन (Alcohol Dinker Cock) जडल्याचे ऐकले असेल, मात्र कधी तुम्ही व्हिस्की, बिअर, बोडका, पिणारा कोंबडा पाहिलाय का? नाही ना? पण आम्हाला एक कोंबडा भंडाऱ्यात (Bhandara) असा सापडला आहे की ज्याला रोज घसा ओला करावाच लागतो. ना त्याशिवाय तो काही ना पितो…अगदी पाणीही प्यायला त्याला दारुत मिक्स करून द्यावे लागते. या तळिराम कोंबड्याला चक्क दारुचं व्यसन जडलंय. सुरूतावीतला तर या मालकाने कोंबड्याचा आजार घालवण्यासाठी दुसऱ्याच्या सागण्यावरून या कोंबड्याला दारू पाजली, मात्र आता आता सराईत बेवडा (Alcoholism) होऊन बसलाय. मात्र त्याच्या या पेताडपणामुळे मालकाचा खिसा रोज रिकाम होऊ लागला आहे. त्यामुळे मालक आता कोंबड्याची दारु सोडवण्याचा उपाय शोधत आहे. आता तुम्हीच सांगा या कोंबड्याची दारु सोडवायची तर कशी?
कोंबडा दारू पितानाचा व्हिडिओ
कुठला आहे बेवडा कोंबडा?
भंडारा शहरानजीक असलेल्या पिपरी पुनर्वसन गावातील रहिवासी भाऊ कातोरे पेशाने शेतकरी आहेत. भाऊ कातोरे यांना कुक्कुटपालन करण्याचा छंद जडला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे विविध प्रजातीचे कोंबडे पहायला मिळतात. मात्र यातल्याचा एका कोंबड्याला चक्क दारु पिण्याची सवय लागली आहे. आता बघा मालक चक्क पाण्यात दारू मिसळून कोंबड्याला देतोय. त्याशिवाय हा कोंबडा काही खातही नाही, खायचं तर सोडा हा कोंबडा पाणीही पित नाही. मागिल वर्षी कोंबड्यांना मरी रोग आला होता. आपल्या प्रिय कोबड्याला मरी रोग जडल्याने कोंबड्यानं खाणं, पाणी सोडलं होतं. तेव्हा कुणीतरी सांगितले म्हणून मरी रोगावर उपाय म्हणून त्यांनी काही महीने मोहफूलाची देशी दारू पाजली. मात्र मोजफुलाची दारू मिळेना झाल्यावर त्यांनी विदेशी पाजली.
मालकाला मोठी झळ
या कोबड्याला रोज 45 मिलीचा पैक लागतो तेव्हाच तो सेट होतो. मात्र याचे शौक पुरवता पुरवता दर महिन्याला मालकाला 2 हज़ार रूपयांची झळ बसत असून आता दुरूसाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे चितेत पडलेल्या मालकाने आपल्या प्रिय कोंबड्याचे दारूचे व्यसन सोडवन्यासाठी प्रयत्न सुरु केले असून पशुवैद्यकिय दवाखाण्यात पायपिट सुरु आहे. डॉक्टरांनी मात्र या कोंबड्याला दारुपासून कोणताही धोका किंवा नुकसान होणार नाही असे सांगितले आहे. उलट कोंबड्याच्या पोटातील जंतू मरतील असे डॉक्टरांचे सांगणं आहे. मात्र आर्थिक झळीला वैतागलेल्या मालकाने आता कोंबड्याची दारु सोडवण्यासाठी इतर उपाय सुरू केले आहेत.
Non Stop LIVE Update