Bhandara Crime | भंडाऱ्यात मुलीसोबत बोलण्याचा वाद, मिरचीपूड टाकून युवकाला संपविले, पाच जण अटकेत

भंडाऱ्यातील तुमसरातील ही घटना. एका मुलीसोबत बोलण्यावरून दोघांमध्ये वाद होता. एकानं दुसऱ्याचा गेमच केला. मित्रांना सोबत घेऊन तरुणाला संपविलं. पण, तोही आता पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मित्रही जेरबंद झालेत.

Bhandara Crime | भंडाऱ्यात मुलीसोबत बोलण्याचा वाद, मिरचीपूड टाकून युवकाला संपविले, पाच जण अटकेत
तुमसरात युवकाचा खून झाला होता. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 1:39 PM

भंडारा : मुलीसोबत बोलण्याच्या वादात आपला खून होईल, या भीतीतून तुमसरातील ( Tumsar) सलून व्यावसायिक तरुणाचा पाच जणांनी खून केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणाचा छडा लावत तीन विधीसंघर्षग्रस्त (Legal Struggle Child) बालकांसह दोन तरुणांना ताब्यात घेतले. घनश्याम ऊर्फ रोशन रमेश भजने (वय 20), शाम मनोहर कुंदवानी (वय 20) अशी आरोपींची नावे आहेत. उर्वरित तीन विधीसंघर्षग्रस्त अल्पवयीन बालके आहेत. तुमसरात मिरची पूड टाकून हत्येचा सुगावा लागला. मुलीसोबत बोलण्याच्या वादातून पाच जणांनी खून केल्याचे उघड झाले. तीन विधिसंघर्षग्रस्त बालक व दोन तरुण आरोपी आहेत.

मुलीसोबत बोलण्यावरून होता वाद

पोलिसांना तपासाअंती सुगावा लागला की, आरोपी रोशन भजने हा आंबेडकर वॉर्डातील एका मुलीसोबत बोलत असे. त्यावरून मृतक मोनू व रोशन यांच्यात गत काही दिवसांपासून वाद होता. या वादातून आपला खून होऊ शकतो, अशी भीती रोशनच्या मनात होती. त्यातूनच त्याने मोनूला संपवण्याचा कट रचला. मंगळवारी सायंकाळी माकडेनगरात मोनू आपल्या दुकानात बसला होता. आपल्या चार मित्रांना घेऊन रोशनने धारदार शस्त्राने खून केला. सर्व आरोपी पसार झाले.

पाचही आरोपी अटकेत

या घटनेने तुमसर शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, तुमसर पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींचा शोध घेतला. त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा, अनुसूचित जाती-जमाती प्रधान प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. खुनाचे सर्व आरोपी अटकेत असून पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.

Babasaheb Ambedkar | बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे संग्रहालय अर्धवट! नागपुरातील संग्रहालय रखडल्याचे कारण काय?

Photo : Babasaheb Ambedkar Jayanti | नागपुरातील चिचोलीत बाबासाहेबांच्या वस्तूंचा संग्रह; ऐतिहासिक वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया

Nagpur Education | मनपाच्या 6 इंग्रजी शाळा कार्यरत, मनपा आयुक्तांची शाळांना भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.