Bhandara Crime | लाखनीत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; दुचाकीवर बसवणाऱ्या दोन आरोपींना अटक

रेंगेपार (कोहळी) येथील अनिकेत किशोर शहारे (वय 20) आणि सूरज जिवतोडे ( वय 22) अशी आरोपींची नावं आहेत. त्यांच्याविरोधात अल्पवयीन मुलीला पळवून नेणे, तिचा विनयभंग करणे तसेच पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. अनिकेत व सूरज या दोघांना अटक केली आहे, अशी माहिती लाखनीचे पोलीस निरीक्षक मनोज वाढई यांनी दिली.

Bhandara Crime | लाखनीत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; दुचाकीवर बसवणाऱ्या दोन आरोपींना अटक
लाखनीत मुलीला पळवून नेणाऱ्या दोघांना अटक. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 12:11 PM

भंडारा : लाखनीत (Lakhni) शाळा सुटल्यानंतर अल्पवयीन मुलगी (minor girl ) ऑटोची वाट पाहत होती. तिला भुलथाप देत बळजबरीने दुचाकीवर ( two-wheeler) बसवून पळवण्यात आले. ही बाब मुलीच्या वडिलांच्या लक्षात आली. तिच्या वडिलांनी पाठलाग करून मुलीला पळविणाऱ्या युवकाला वाटेत पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. रेंगेपार (कोहळी) येथील अनिकेत किशोर शहारे (वय 20) आणि सूरज जिवतोडे ( वय 22) अशी आरोपींची नावं आहेत. त्यांच्याविरोधात अल्पवयीन मुलीला पळवून नेणे, तिचा विनयभंग करणे तसेच पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. अनिकेत व सूरज या दोघांना अटक केली आहे, अशी माहिती लाखनीचे पोलीस निरीक्षक मनोज वाढई यांनी दिली.

आठवड्यापासून करत होता पाठलाग

पीडित अल्पवयीन मुलगी ही 15 वर्षाची आहे. ती भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पिंपळगाव (सडक) येथील आहे. शिक्षणासाठी ती दररोज लाखनी येथे शिकायला येते. गावातून ती शाळेत एकटीच येत असते. मागील आठ-दहा महिन्यापासून अनिकेत शहारे हा तिचा नेहमी पाठलाग करत होता. तिला विक्षिप्त इशारे करीत होता. याबाबत मुलीने तिच्या वडिलांकडे सदर युवकाची तक्रार केली होती. मुलीच्या वडिलांनी सदर युवकाला अनेकदा समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाळा सुटल्यानंतर अल्पवयीन मुलगी गावाला जाण्यासाठी ऑटो पकडण्याच्या प्रयत्नात होती.

तहसील कार्यालयाजवळ बसविले दुचाकीवर

लाखनी येथील तहसील कार्यालयाजवळ पोहोचली. या संधी साधून सुरज जीवतोडे हा दुचाकीने तिच्याजवळ पोहचला. यावेळी त्याने अल्पवयीन मुलीला धमकी देत तिला बळजबरीने दुचाकीवर बसवले व तिथून पळ काढला. दरम्यान, गावाजवळ उभ्या असलेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना त्यांच्या मुलीला कुणीतरी दुचाकीवरून पळवून नेत असल्याची बाब लक्षात आणून दिली. तिच्या वडिलांनी दुचाकीचा पाठलाग करून युवकाला ताब्यात घेतले. पीडितेच्या वडिलाच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी अनिकेत शहारे आणि सुरज जीवतोडे या दोघांविरुद्ध अल्पवयीन मुलीला पळवून नेणे, तिचा विनयभंग करणे यासह पॉक्सो अंतर्गत कारवाई केली.

Video Buldana Leopard | खल्ल्याळ गव्हाण परिसरात विहिरीत पडला बिबट; वन विभागाच्या टीमने काढले सुखरूप बाहेर

Nagpur ZP | पंचायती राज समितीचा नागपूर दौरा; शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागातील अनियमिततेवर रोष

Mahatma Phule | तृतीय रत्न नाटक 10 एप्रिलपासून महाराष्ट्रात, चंद्रपुरातील लोकजागृती संस्था सादर करणार प्रयोग

डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.