भंडारा : जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. या पावसात जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत होते. या पुराचा फटका नदी, नाल्या काठावरील गावांना बसला आहे. तुमसर तालुक्यातील (farmers in Tumsar taluka) पिपरा (Pipra) गावात संत रविदास मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था आहे. या आधारभूत धान खरेदी केंद्रांवर (paddy buying center) शेतकऱ्यांची धान खरेदी केली होती. पण दोन दिवस आलेल्या पावसाने या संस्थेचे हजारो क्विंटल धान पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या धानाची पोती नाल्याच्या बाजूला पडलेली आहेत.हे धान आता सडले आहे. त्यामुळं कोण खरेदी करू शकणार नाही.
भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्याची धान खरेदी करण्यात आली. तुमसर तालुक्यातील पिपरा गावात असलेल्या धान खरेदी केंद्रांवर हजारो क्विंटल धान खरेदी करण्यात आले. मात्र अचानक रात्रीच्या सुमारास जवळ असलेल्या नाल्याला पूर आला. संपूर्ण धान वाहून गेले. जवळपास 51 हजार धानाची पोती वाहून गेली आहेत. आज या पुराला आठवडा उलटूही विदारक वास्तव अद्यापही कायम आहेत. त्यामुळं धान खरेदी केंद्र चालकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी धान केंद्राचे संचालक नितीन भोंडेकर आहे.
भंडाऱ्यात आलेल्या पुराची धग अजूनही पेटताना दिसत आहे. पिपरा येथे धान खरेदी करून केंद्र संचालकानं ठेवले होते. रात्री जोरदार पूर आला. नाल्याशेजारी असलेल्या केंद्रातील धानाची पोती त्या पुरात वाहून गेली. यामुळं केंद्र संचालकाचं मोठं नुकसान झालं आहे. या केंद्र संचालकानं स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करू हे धान खरेदी केले होते. पण, पुरात होत्याचं नव्हते झाले. त्यामुळं मलासुद्धा पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नितीन भोंडेकर यांनी केली आहे.