नाल्याच्या पुरातून वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला; राखी घेऊन जात असताना घडली होती दुर्घटना; सिलेगावमधील घटना
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सिलेगाव येथील धोंडी नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा तीन दिवसानंतर मृतदेह आढळला आहे. मंगळवारी नाला पार करताना दुचाकीसह ते वाहून गेले होते, या नाल्यात वाहून नाल्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव राधेश्याम बळीराम सांगोळे ( वय 52, रा. तिरोडा) आहे.
भंडाराः सध्या राज्यातील विविध भागात प्रचंड पाऊस (Heavy Rain) सुरू आहे, त्यामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. काही भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक मार्ग बंद करण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागात पावसामुळे अनेक नदी नाल्यांवर पूर आल्याने नागरिकांना प्रवास करणे अवघड बनले होत, तरीही काही भागात नाल्यावर पाणी येऊन त्यातून प्रवास करत असल्याने दुर्देवी घटना घडल्या आहेत. याप्रकारची घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर (Tumsar Bhandara) तालुक्यात घडली आहे. सिलेगावातील (Silegaon) धोंडी नाल्यावर पाणी असतानाही त्यातून सिहोरामार्गे मध्य प्रदेशातील बोनकट्टा येथे जात असताना दोघे जण पाण्यातून वाहून गेले होते, त्यापैकी एक जण पाण्यातून पोहत बाहेर आला होता, मात्र एकाचा 16 तारखेपासून पत्ता लागला नव्हता, त्या व्यक्तीचा आज मृतदेह आढळून आला आहे. राखी घेऊन जात असताना ही दुर्घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सिलेगाव येथील धोंडी नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा तीन दिवसानंतर मृतदेह आढळला आहे. मंगळवारी नाला पार करताना दुचाकीसह ते वाहून गेले होते, या नाल्यात वाहून नाल्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव राधेश्याम बळीराम सांगोळे ( वय 52, रा. तिरोडा) आहे.
पुरातून दोघेही वाहून गेले
या महिन्याच्या 16 ऑगस्ट रोजी राधेश्याम आपला मित्र विशाल गजभिये याच्यासोबत सिहोरामार्गे मध्यप्रदेशातील बोनकट्टा येथे मामाच्या गावी राखी घेऊन जात होते. त्यावेळी सिलेगाव येथील धोंडीनाला पार करताना पुलावरील पाण्याचा अंदाज आला नसल्याने दोघेही दुचाकीसह वाहून गेले होते, मात्र विशाल पुरातून सुरक्षित बाहेर आला होता. तर राधेश्याम वाहून गेला होता.
गेल्या तीन दिवसांपासून शोध
वाहून गेले त्यादिवसांपासून त्याचा शोध घेण्यात येत होता. मात्र तब्बल तीन दिवसानंतर धोंडी नाल्यातील झुडूपामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी सिहोरा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास हवालदार इळपाते करीत आहे.