Bhandara : हायवेवरच हत्याकांड! भंडाऱ्यातील थरारक हत्येप्रकरणी तिघांना अटक, बहिणीला घेऊन पळाल्यानं हत्या

Bhandara crime : बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून हत्येच्या दिवसी पूर्ण प्लॅन तिघांनी मिळून केला होता

Bhandara : हायवेवरच हत्याकांड! भंडाऱ्यातील थरारक हत्येप्रकरणी तिघांना अटक, बहिणीला घेऊन पळाल्यानं हत्या
तुमसर शहरात प्रेमप्रकरणातून चाकूने भोसकून खूनImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 7:30 AM

भंडारा : भंडारा (Bhandara crime) जिल्ह्यातील तुमसर शहरात हायवेवरच एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. दोन दिवस अगोदर झालेल्या या हत्याकांड प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तुमसर पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली. प्रेमप्रकरणातून (Bhandara Murder Love Affaire) हे हत्याकांड घडलं होतं. सचिन मस्के नावाच्या तरुणाचा खून करण्यात आला होता. भरदिवसा हायवेवरच कोयत्यानं वार करत या तरुणाचे तुकडे तुकडे करण्यात आले होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली होती. या हत्याप्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं असून हे कांड करणाऱ्या तिन्ही आरोपींनी पोलिसांनी (Bhandara News) बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई केली जातेय. पोलिसांनी या तिघांचीही चौकशी केली असून या चौकशीतून खळबळजनक खुलासा झाला आहे.

का केली हत्या?

सचिन मस्के या तरुणावर धारदार शस्त्रानं सपासप वार करण्यात आले होते. सचिन मस्के आणि आरोपींच्या कुटुंबातील एका मुलीला घेऊन पळून गेला होता. त्यावेळी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आलेली. दरम्यान, नंतर मुलीसह सचिनही आपआपल्या घरी परतले होते.

या धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हे सुद्धा वाचा

मात्र सचिनने कुलदीप लोखंडे यांच्या बहिणीला पळवून नेल्याचा राग टोकाला गेला. यातूनच कुलदीप लोखंडे यांनं भररस्त्यात सचिनचा मुडदा पाडला. बाईकवरुन दोघे जण सचिनला हायवेवर एका ठिकाणी घेऊन आले. त्यानंतर कुलदीप दुसऱ्या एका दुचाकीवर आला. त्यानंतर आपल्या दुचाकीतून एक धारदार शस्त्र काढलं आणि सचिन मस्के याच्यावर सपासप वार केले. यावेळी बाईकवरील इतर दोघांनी सचिनचे हात पाय पकडून ठेवले होते.

हायवेवर हत्याकांड

हत्येचा हा सगळा थरार हायवेवरच घडला होता. दिवसाढवळ्या हे हत्याकांड करण्यात आलं होतं. ही खळबळजनक घटना हायवेशेजारील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली होती. तुमसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षण नितीन चिंचोळकर यांनी या हत्येबाबत माहिती दिली. हत्या करुन झाल्यानंतर तिन्हीही आरोपी पसार झाले होते. या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून हत्येच्या दिवसी पूर्ण प्लॅन तिघांनी मिळून केला होता. यात करुण रंजीत गभने, केतन मदारकर यांनी मृतकाला आपल्याच सोबत एकाच दुचाकीवर घेऊन गेले होते. रस्त्यात उभा आसलेल्या मुख्य आरोपी कुलदीप लोखंडे यांनी सचिनवार धारधार शास्त्राने वार करत तिन्ही आरोपी पसार झाले होते. अखेर या तिघांनाही बेड्या ठोकण्यात आल्यात.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.