Bhandara Leopard : उपचार करण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यावर बिबट्याचा हल्ला! मोहघाटा जंगलातील घटना

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये कृष्णा सानप हा 324 वर्षीय वनरक्षक जखमी झालाय.

Bhandara Leopard : उपचार करण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यावर बिबट्याचा हल्ला! मोहघाटा जंगलातील घटना
बिबट्याचा हल्लाImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 8:12 AM

भंडारा : भंडारा (Bhandara News) जिल्ह्यामध्ये जखमी बिबट्यावर (Leopard) वन कर्मचारी उपचार करण्यासाठी गेला होता. पण त्याच्यावर बिबट्याने हल्ला केल्यानं भीती पसरली आहे. या हल्ल्यामुळे वन कर्मचारी जखमी झालाय. भंडारा जिल्ह्यातील मोहघाटा जंगलातील शिवारात बिबट्याने वन कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला. दरम्यान या हल्ल्यानंतर आता जखमी वन कर्मचाऱ्याला जिल्हा समान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अज्ञात ट्रकच्या धडकेत एक मादी बिबट जखमी झाली होती. या बिबट्यावर उपचार करण्याची गरज होती. त्यासाठी वन कर्मचाऱ्याला तैनात करण्यात आलं. पण त्याच्यावर उलट बिबट्याने हल्ला (Bhandara Leopard attack) केल्यामुळे घबराट पसरली आहे. या हल्ल्यानंतर बिबट्या पुन्हा जंगला पळून गेला. तर गंभीर जखमी वन कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्यानं काळजी व्यक्त केली जातेय.

34 वर्षीय वन कर्मचारी जखमी

भंडारा जिल्ह्यामधील मोहघाटा जंगल शिवारात महाराष्ट वन विकास महामंडळ रोपवाटिका जवळ बिबट्यानं वन कर्मचाऱ्यावर हल्ला केला. सध्या कृष्ण सानम यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कृष्ण सानप हे मादी बिबटवर उपचार करत असतानाच हा हल्ला झाला. बिबट्याच्या हल्ल्यामुळे वन कर्मचारीही धास्तावलेत.

नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर लाखनी कडून साकोली कडे जात असलेल्या अज्ञात ट्रकच्या धडकेत मादा बिबट जखमी झाल्याची घटना समोर आली होती. दरम्यान याची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर तत्काळ साकोलीचे सहाय्यक वनरक्षक राठोड आणि लाखनीचे वनरक्षक कृष्णा सानप हे घटनास्थळी पोहचले. रस्त्यावर पडलेल्या जखमी मादा बिबटाला उपचार करत असताना मादा बिबट्याने लाखनीचे वनरक्षक कृष्णा सानप (34) यांच्या हल्ला चढविला आणि बिबट जंगल शिवारात पळून गेला.

हे सुद्धा वाचा

यानंतर लाखनीचे जखमी वनरक्षक यांना प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे भरती करण्यात आले. नंतर प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती करण्यात आले आहे. दरम्यान जखमी मादा बिबट हा जंगलशिवारात पळून गेला असल्याने त्याचा वनकर्मचारी शोध घेत आहे. मात्र संतधर पावसामुळे शोध कार्यात अडथळा येतोय.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.