Bhandara Murder : मित्रानेच मित्राला चाकूने भोसकलं! रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून लोक हादरले
Bhandara crime News : पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात, क्षुल्लक वादातून तरुणाची हत्या करण्यात आली, असा संशय व्यक्त केला जातो आहे.
भंडारा : भंडारा जिल्ह्यात मित्रानेच मित्राची हत्या (Bhandara Murder News) केली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. चाकूने भोसकून मित्राने मित्राचा जीव घेतल्याची घडना अड्याळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. एका 26 वर्षांच्या तरुणाचा खून (Murder Case) करण्यात आला. या तरुणाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं निदर्शनास आलं. हा मृतदेह पाहून लोक हादरुन गेले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांनी दिला. पोलिसांनी (Bhandara Police) माहिती मिळताच, तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या तरुणाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल करुन घेत चौकशी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत मित्रानेच मित्राची हत्या केली असल्याचं समोर आलंय. तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटकही केली. सध्या त्यांची कसून चौकशी केली जातेय. या तरुणाची हत्या नेमकी कोणत्या कारणावरुन करण्यात आली, हे कळू शकलेलं नाही. पोलीस त्याअनुशंगानं पुढील तपास करत आहेत.
नेमकं घडलं काय?
भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माडगी तिर्री इथं हत्येची घडना घडली. अंसारी वॉर्ड इशं राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणाचा मृतदेह बुधवारी दुपारच्या सुमाराल लोकांच्या निदर्शनास आला. या तरुणाचं नाव राकेश कोवे असं असल्याचं समोर आलं. माडगी तिर्री मार्गावरुन जात असताना काही लोकांना राकेश बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानं दिसलं. यानंतर पोलिसांना स्थानिकांची याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेत पुढील चौकशी सुरु केली.
हत्येचं कारण काय?
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात, क्षुल्लक वादातून तरुणाची हत्या करण्यात आली, असा संशय व्यक्त केला जातो आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यातही घेण्यात आलं आहे. चाकूनं भोसकून राकेश कोवे या तरुणाचा खून करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून घेतलाय. सध्या ताब्यात घेतलेल्यांचूी कसून चौकशी केली जातेय. अंतर्गत वादातून मित्रानेच राकेशला चाकू भोसकला आणि त्याचा जीव घेतला, असा संशय व्यक्त केला जातोय. याप्रकरणी पोलीस आता सखोल तपास करत आहेत.