आधी बाईकवरून घेऊन आले, मग रस्त्याच्या मधोमध आडवा पाडतं त्याचे तुकडे पाडले! प्रेमप्रकरणातून थरारक हत्याकांड
सचिनचं एका मुलीवर प्रेम होते. तो तिला घेऊन पळून गेला. त्यानंतर दोन दिवस बाहेर राहिले. यासंदर्भात पोलीस तक्रार झाली. दोन दिवसांनंतर ते परत आले. मुलगी आपल्या घरी गेली. तरीही सचिन मुलीला त्रास देत असल्याची माहिती होती. त्यावरून मुलीच्या घरच्यांनी सचिनचा गेम करायचं ठरविलं.
भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरात (Tumsar City) काल सायंकाळच्या सुमारास खून करण्यात आला. मृतकाचे नाव सचिन मस्के (Sachin Muske) असे आहे. सचिन आरोपींच्या परिवारातील मुलगी घेऊन दोन दिवसांपूर्वी पसार झाला होता. त्यावेळी तुमसर पोलिसात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली. त्यानंतर दोघेही आपआपल्या घरी गेले होते. मात्र सचिन हा फोन करून घरच्या लोकांना त्रास देत होता. याचा राग मनात धरून आरोपींनी सचिनचा खून केला. धारधार शास्त्राने वार करत हत्या केली. आरोपींपैकी दोन जण मृतकाच्या दुचाकीवर बसून आले होते. समोरून एक व्यक्ती सुरा घेऊन सचिनच्या जवळ आला. त्याच्यावर सपासप वार केले. तीन जणांनी मिळून सचिनचा गेम केला. हत्या हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला. तुमसर पोलीस (Tumsar Police) आता आरोपींचा शोध घेत आहेत.
सीसीटीव्हीत काय दिसते?
एका दुचाकीवर तीन जण बसून आले. मृतक सचिन हा गाडी चालवित आला. त्याच्या गाडीवर दुसरे दोन जण मागे बसले होते. एका दुकानासमोर दुसऱ्या आरोपीने गाडीतून धारदार सुरा काढला. तो सुरा दुपट्ट्यात गुंडाळून सचिनच्या दिशेने धावत सुटला. दुचाकीवरून दोघे जण खाली उतरले. सचिनवर धारदार सुऱ्याने वार करण्यात आले. दुचाकीवरून तो खाली पडला. त्यानंतर एकाने शस्त्राने सचिनच्या मानेवर सपासर वार केले. दुसरे दोघे सचिन मेला की जीवंत आहे ते पाहत होते. त्यानंतर पुन्हा सचिनच्या मानेवर एक आरोपी वार करत होता. बाजूने वाहतूक सुरूच होती. सचिन जीवाच्या आकांताने फडफडत होता. आरोपी जीव जाईपर्यंत सुऱ्याने वार करत होता. सचिनचा जीव गेल्याची खात्री झाल्यानंतर आरोपीच्या गाडीने तिघेही निघून गेले. बाजूला सचिनची गाडी पडली होती. सचिनचा मृतदेह रस्त्यावर पडून होता.
हत्तेचं कारण काय?
सचिनचं एका मुलीवर प्रेम होते. तो तिला घेऊन पळून गेला. त्यानंतर दोन दिवस बाहेर राहिले. यासंदर्भात पोलीस तक्रार झाली. दोन दिवसांनंतर ते परत आले. मुलगी आपल्या घरी गेली. तरीही सचिन मुलीला त्रास देत असल्याची माहिती होती. त्यावरून मुलीच्या घरच्यांनी सचिनचा गेम करायचं ठरविलं. हे तीन आरोपी मुलीचे जवळचे नातेवाईक असण्याची शक्यता आहे. अतिशय क्रूर पद्धतीनं सचिनचा जीव घेण्यात आला.