VIDEO : या राष्ट्रीय महामार्गवर पट्टेदार वाघ दर्शन, बिनधास्त रमतगमत चालणारा वाघ पाहून गाड्या चालकांना घाम फुटला
जंगल सोडून प्राणी मानवी वस्तीत अधिक पाहायला मिळत आहेत. काही वाघांना जेरबंद करुन पुन्हा जंगलात सोडले जात आहे. महाराष्ट्रात बिबट्याचं प्रमाण अधिक असल्यामुळे बिबट्याच्या रोज हल्ल्याच्या आणि दर्शन झाल्याच्या घटना उजेडात येत आहेत.
भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्हातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 6 (National Highway) वर साकोली येथील मोहगाव जंगल परिसरातील महामार्गावर पट्टेदार वाघाचे (tiger) रस्ता ओलांडताना करतांनाचे दर्शन झाले आहे. गाड्याची रहदारीचा विचार केल्यास वाघाचा अपघाती मृत्यू थोडक्यात टळला आहे. जवळच नवेगाव नागझिरा अभयारण्य असल्याने तिथून हा वाघ आला असावा अशी शंका उपस्थितांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या मार्गाचे चौपदरीकरनाचे काम सुरु असल्याने कामगार घाबरले असल्याची माहिती मिळाली आहे.
दूसरीकड़े राष्ट्रीय महामार्ग सहावर गेल्या 15 वर्षांपासून वन्यप्राण्यांसाठी असणाऱ्या उपशमन योजना प्रलंबित आहेत,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तर त्याचे गांभीर्य अजिबात नाहीच, पण वनखात्यालाही गेल्या 15 वर्षांत हा मुद्दा लावून धरावा वाटला नाही. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाला लागून हा महामार्ग आहे. यापूर्वी अनेकदा या महामार्गावर बिबट्यासह इतरही अनेक वन्यप्राणी मृत्युमुखी पडले आहेत.
मात्र, हे प्रकरण प्राधिकरणाने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या महामार्गावर उड्डाणपुलासह भूयारी मार्गदेखील प्रस्तावित आहेत. यातील काही उपशमन योजना अजूनही कागदावरच आहे, तर काही उपशमन योजनांचे काम कासवापेक्षाही संथगतीने सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच या महामार्गावर व्याघ्रदर्शन झाले होते. तर पुन्हा एकदा एक वाघ हा महामार्ग ओलांडताना दिसून आला आहे. वाघ हा महामार्ग ओलांडत असतानाच दोन्ही बाजूने दोन मोठे ट्रक वेगाने या मार्गावरून गेले आणि महामार्ग ओलांडणाऱ्या वाघाचा मृत्यू थोडक्यात टळला असं व्हिडीओत दिसत आहे.
जंगल सोडून प्राणी मानवी वस्तीत अधिक पाहायला मिळत आहेत. काही वाघांना जेरबंद करुन पुन्हा जंगलात सोडले जात आहे. महाराष्ट्रात बिबट्याचं प्रमाण अधिक असल्यामुळे बिबट्याच्या रोज हल्ल्याच्या आणि दर्शन झाल्याच्या घटना उजेडात येत आहेत. उसाच्या शेतात बिबट्याचा अधिक वास्तव असल्याचं आढळून आलं आहे.