बीआरएसचे चरण वाघमारे यांना धक्का, संदीप टाले यांच्यासह तिघांचा भाजपात प्रवेश

बीआरएसचे विदर्भातील नेते चरण वाघमारे यांना मोठा धक्का बसला. त्यांच्यासोबत असलेले तीन प्रमुख नेते भाजपामध्ये गेले. यामुळे विदर्भातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

बीआरएसचे चरण वाघमारे यांना धक्का, संदीप टाले यांच्यासह तिघांचा भाजपात प्रवेश
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 9:41 PM

भंडारा : भाजपानं बीआरएसचे विदर्भातील नेते चरण वाघमारे गटाच्या 5 सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत याचिका दाखल केली आहे. त्या कारवाईची टांगती तलवार असल्याने यापूर्वी दोघांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर, आज तिघांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या प्रवेशानं बीआरएस पक्षाचे नेते चरण वाघमारे यांना जबर धक्का बसला आहे. अपात्रतेची टांगती तलवार असलेले भंडारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बीआरएस पक्षाचे संदीप टाले यांनी अन्य दोन जिल्हा परिषद सदस्यांसह आज नाट्यमयरीत्या भाजपात प्रवेश केला. यामुळं भंडारा जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. संदीप टाले हे बीआरएस पक्षाचे विदर्भाचे नेते माजी आमदार चरण वाघमारे यांचे खंद्दे समर्थक म्हणून ओळखले जातात.

या तिघांनी केला भाजपामध्ये प्रवेश

संदीप ताले यांच्यासह उमेश पाटील आणि धृपदा मेहर या अन्य दोन अशा तिघांनी भाजपात प्रवेश केला. भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. 52 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 21 सदस्य आहेत. 1 अपक्ष आणि भाजपचे बंडखोर नेते माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाच्या 5 सदस्यांना घेऊन काँग्रेसनं सत्ता काबीज केली आहे.

काँग्रेसला सध्यातरी धोका नाही

भाजपचे विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, माजी राज्यमंत्री परिणय फुके यांच्या उपस्थितीत या तिघांनी आज नागपूर इथं भाजपात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये सत्तेत सहभागी असताना काँग्रेसला सोडून पाच जणांनी भाजपात प्रवेश केला असला तरी, भाजपाकडे विश्वासदर्शक ठरावाच्या आवश्यक असलेला 35 हा आकडा जुळत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेमधील काँग्रेसच्या सत्तेला सध्यातरी धोका नाही.

काँग्रेसला सोबत घेऊन चरण वाघमारे यांची झेडपीमध्ये सत्ता

भंडारा जिल्हा परिषदेत एकूण सदस्य संख्या 52 आहे. सत्ता काँग्रेसच्या हातात आहे. त्यांच्याकडे बहुमताचा आकडा 27 आहे. काँग्रेस सदस्य संख्या 21 आहे. चरण वाघमारे गटाचे 5 सदस्य आहेत. एक अपक्ष सदस्य झेडपीच्या सत्तेस सहभागी आहेत. भंडारा झेडपीमध्ये विरोधी पक्षाकडे 25 सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे 13 सदस्यसंख्या आहे. भाजपची सदस्य संख्या 7 आहे. अपक्ष 3, बसपा 1 आणि शिवसेना 1 अशी भंडारा जिल्हा परिषदेमध्ये सदस्यसंख्या आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.