Bhandara | साकोली येथे ट्रक आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात, चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू

ट्रक आणि ट्रॅव्हल्समधील अपघातामध्ये चालक आणि क्लिनरचा मृत्यू झाला असून ट्रॅव्हल्समधील अनेक प्रवासी जखमी आहेत. भंडारा साकोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोहघाट जंगल परिसरामध्ये ही घटना घडली असून झालेल्या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील चालक क्लिनरचा घटनास्थळीच मृत्यु झाला.

Bhandara | साकोली येथे ट्रक आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात, चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 11:07 AM

भंडारा : भंडाऱ्यातील (Bhandara) साकोली येथे ट्रक आणि ट्रॅव्हल्समध्ये मोठा अपघात झालायं. ट्रक व ट्रॅव्हल्समधील अपघात इतका जास्त भीषण होता की, अपघातामध्ये ट्रॅव्हल्स चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्रीच्या अंधारात ट्रॅव्हल्स (Travels) चालकाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक दिसला नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. हंसा ट्रॅव्हल्स रायपूरवरून (Raipur) नागपूरकडे निघाली असताना हा अपघात झाला. नादुरुस्ती स्थितीमध्ये उभा असलेल्या ट्रकला भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने मागुन जोरदार धडक दिली.

अपघातामध्ये चालक आणि क्लिनरचा मृत्यू

ट्रक आणि ट्रॅव्हल्समधील अपघातामध्ये चालक आणि क्लिनरचा मृत्यू झाला असून ट्रॅव्हल्समधील अनेक प्रवासी जखमी आहेत. भंडारा साकोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोहघाट जंगल परिसरामध्ये ही घटना घडली असून झालेल्या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील चालक क्लिनरचा घटनास्थळीच मृत्यु झाला. ही संपूर्ण घटना सकाळी उघडकीस आली. अपघातामध्ये ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाल्याचे दिसते आहे.

हे सुद्धा वाचा

हंसा ट्रॅव्हल्स नागपूरकडे भरधाव वेगाने निघाली

रायपूरवरून निघालेली हंसा ट्रॅव्हल्स नागपूरकडे भरधाव वेगाने जात असताना उभ्या असलेल्या ट्रकला भीषण धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात ट्रॅव्हल्सच्या समोरील भाग चकणाचूर झाला आहे. दरम्यान ट्रॅव्हल्समधील जखमी प्रवाशांना साकोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सद्या जखमी प्रवाशांची प्रकृती धोक्या बाहेर आहे. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरून वाहतूक संत गतीने सुरू आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.