भंडारा ते गोसेखुर्द 50 किमी जलपर्यटन विकसित करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

राज्याच्या दृष्टीकोणातून हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांशी आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर ते संवाद साधत होते.

भंडारा ते गोसेखुर्द 50 किमी जलपर्यटन विकसित करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Nov 12, 2022 | 2:48 PM

भंडारा : भंडारा ते गोसेखुर्द 50 किमी जलपर्यटन विकसित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडाऱ्यात केली. जलपर्यटनामुळं भंडारा येथील लोकांना रोजगार मिळेल, असं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांकडून गोसेखुर्द जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री दिवसभर भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पाण्याचं प्रदूषण होणार नाही. जलपर्णीदेखील जाईल. हे सगळं करत असताना पाणी कुठही प्रदूषित होणार नाही. याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. खासदार, आमदार व अधिकारी आहेत. मोठ्या प्रमाणावर पोटेन्शियल आहे.

सरकारनं निर्णय घेतला की, तुमची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. चांगले निर्णय घेतले. ते लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. राज्याच्या दृष्टीकोणातून हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांशी आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर ते संवाद साधत होते.

तीन महिन्यांत उद्योग बाहेर जायला ती जादूची कांडी आहे का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. राज्यातून बाहेर गेलेल्या उद्योगांवर मुख्यमंत्री शिंदे यांनी हे भाष्य केलंय. महाविकास आघाडीला हा अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय. आमचं सरकार उद्योगांना चालना देणार असल्याचंदेखील मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटलंय. नागपुरात विमानतळावर उतरल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

क्लस्टर प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं विरोधकांनी टीका केली आहे. या टीकेल्या एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. शिंदे म्हणाले, कुठलाही प्रकल्प तीन महिन्यात येतो आणि जातो असं कधी घडलेलं आहे का. ही काही जादूची कांडी नसते की, फिरवलं नि इकडं आला नि तिकडं गेला. आरोप करायचं तर कुणीही आरोप करू शकतो. आमचं सरकार उद्योगांचा चालना देणारं, उद्योगांचं स्वागत करणार सरकार आहे, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.