एकीकडे पाऊस दुसरीकडे चिखल; असा साजरा केला जातो चिखल महोत्सव

इंटरनॅशनल शाळांमध्ये मड बॉथ ही संकल्पना राबवली जाते. ही संकल्पना खर तर या चिखल महोत्सवातून शाळा संचालकांनी विद्यार्थ्यांसमोर आणली. दहावी, बारावीचे विद्यार्थी चिखल महोत्सवात सहभागी झाले होते.

एकीकडे पाऊस दुसरीकडे चिखल; असा साजरा केला जातो चिखल महोत्सव
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 10:58 PM

भंडारा : तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी मोबाईल, लॅपटॉपच्या दुनियेत रमतात. प्रत्यक्ष मैदानात येऊन खेळण्याचा संबंध खूपच कमी झाला आहे. विविध खेळ मोबाईलमध्ये आल्यानं मुलं मोबाईल हातातून सोडत नाहीत. यामुळं विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होत नाही. चिखलात हात घालायचं म्हटलं किंवा अंगाला चिखल लागलं तरी अलीकडे नको नको वाटतं. मात्र, पावसाळ्यातील खेळ मागे पडत चालले आहेत. हाच धागा पकडत भंडाऱ्यातील ठाणा पेट्रोलपंप येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयानं चिखल महोत्सव घेतला. वेगळेपण दाखविणाऱ्या या चिखल महोत्सवाची आता चर्चा होऊ लागली आहे.

डोक्यापासून पायापर्यंत सर्वजण चिखलानं माखलेले दिसले. विद्यार्थी एकमेकांना न ओळखताही खेळात दंग झाले होते. शिवाय शरीराचा व्यायामदेखील झाला. अभ्यासाच्या दुनियेतील एका वेगळ्या दुनियेचा मनमुराद आनंद प्रत्येक विद्यार्थ्यांनी लुटला. असा प्रयोग प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये राबवावा, अशी भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

mud 2 n

धान रोवणीसाठी चिखलणी केली जाते

धानपट्ट्यात रोवणी करण्यापूर्वी शेतीची मशागत केली जाते. जमीन नांगरली जाते. त्यानंतर पट्टा मारून तण त्याखाली गाडला जातो. ही माती अतिशय मऊ असते. या मातीत धानाचे रोप लावले जाते. यालाच रोवणा असे म्हणतात. रोवणा रोवत असताना माती अतिशय सुंदर असते. या मातीत महिला धानाचे रोप लावतात.

विद्यार्थी जुळले मातीशी

इंटरनॅशनल शाळांमध्ये मड बॉथ ही संकल्पना राबवली जाते. ही संकल्पना खर तर या चिखल महोत्सवातून शाळा संचालकांनी विद्यार्थ्यांसमोर आणली. दहावी, बारावीचे विद्यार्थी चिखल महोत्सवात सहभागी झाले होते. पायाला माती लागली पाहिजे. यातून शरीराला ऊर्जा प्रदान होत असते. हे या चिखल महोत्सवामागचे शास्त्रीय कारण आहे. रोवणी संपली की, चिखलातून धावण्याची स्पर्धा आधी घेतली जायची. आता अशा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी पुन्हा मातीशी जोडले जात आहेत.

नैसर्गिक मातीने केले रोमांचित

आम्ही असं खेळलो नव्हतो. चिखळात खेळल्याने खूप आनंद झाला. नैसर्गिक माती शरीराला रोमांचित करून गेली, असं विद्यार्थिनी म्हणाली. बारावीतील तेजस हटवार म्हणाला, आमच्याकडे शेती आहे. पण, शेतीत असं एन्जाय करू शकतो, असा कधी विचार आला नाही. आमच्या संचालकांनी आपण चिखलातही मजा करू शकतो, हे लक्षात आणून दिलं. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.