“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुट्टीवर की संपावर?”; या प्रकरणावरून काँग्रेस नेत्याने मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली

बारसू रीफायनरी प्रकल्पाबाबद फडणवीस स्वतःचं राजकारण करीत असून महाराष्ट्राच्या विधानसभेत जेव्हा पत्रकाराच्या हत्येप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळेसच आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुट्टीवर की संपावर?; या प्रकरणावरून काँग्रेस नेत्याने मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 7:59 PM

भंडारा : मुमकिन हैं क्या नमकिन हैं आमचं देणं घेणं नाही, पुढच्या काळात यांचा सुपडा साफ झाला पाहिजे, तेव्हाच यांच्या सत्तेचा मस्ती आटोक्यात येईल असं आता महाराष्ट्रातील जनतेला वाटू लागलं असल्याची खरमरीत प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. मोदी हैं तो मुमकिन हैं..! क्या अजित पवार मुख्यमंत्री बन सकते हैं! या अशा प्रश्नांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रोखठोक मत व्यक्त केले आहे. या प्रश्नांशी आमचं काही देणं घेणं नाही, कारण महाराष्ट्रात जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत. शेतकरी, तरुण मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहे. तर दुसरीकडे महागाईही मोठ्या प्रमाणत वाढत चाललेली आहे.

सध्याच्या काळात राजकारणापेक्षा हे महत्वाचे प्रश्न असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. जनतेचे प्रश्न घेवून लढायच की खोक्यांच सरकार बनवायचं की, तानाशाहाचं सरकार बनवायचं असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जनतेला सत्तेचा माज पाहायला मिळतं असून चुकून पहिल्यांदा 105 भाजपचे आमदार निवडून पाठवले असं आता राज्यातील जनतेला वाटत असल्याचेही नाना पटोले यांनी बोलताना सांगितले. ते भंडाऱ्यामध्ये माध्यमांशी बोलत असताना त्यांनी केंद्रावर आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

रामटेक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या गटाने शिंदे गटाचे आशिष जैस्ववाल यांच्याशी हात मिळवणी केल्याने काँग्रेसचे उमेदवार अडचणीत आले आहेत असंही नाना पटोले यांनी सांगितले. याबाबत संपूर्ण माहिती मागवूनच त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रियाही नाना पटोले यांनी दिली.

नाना पटोले यांनी यावेळी राज्य सरकारवरही तोफ डागली आहे. महाराष्ट्रातील जे सरकार आले आहे ते ईडीचे सरकार आहे. हे सरकार संविधानिक असून या सरकारनं महाराष्ट्राचे तीनतेरा वाजवून महाराष्ट्राचे नुकसानच केले आहे.

जनतेचे प्रश्न दररोज वाढले असून शेतकऱ्यांचे प्रश्न असोत वा,खारघरचा प्रश्न असो हे सर्व प्रश्न तेव्हा मुख्यमंत्री संपावर गेलेत की सुट्टीवर असा प्रश्न आता जनता विचारू लागली आहे असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोप होत असून हा प्रकल्प आम्ही नव्हे,तर देवेंद्र फडणवीस राजकारण करत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या सर्व सरकारच्या योजना आपल्या बगलबच्च्यांसाठी राबविल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

बारसू रीफायनरी प्रकल्पाबाबद फडणवीस स्वतःचं राजकारण करीत असून महाराष्ट्राच्या विधानसभेत जेव्हा पत्रकाराच्या हत्येप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळेसच आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता.

तुम्ही कोणत्याही योजना आणताना त्या भागात तुमचे बगलबच्चे जागा घेतात. आणि त्या बगलबच्च्यांना योजना दिल्या जातात.

आमची भुमिका प्रकल्पाच्याविरोधात नसून सरकारने स्थानिक लोकांची आणि विरोधकांची भुमिका समाजून घेतली पाहीजे असा पलटवार नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसावर केला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.