Bhandara Crime: वाळू माफियांकडून अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला; पोलिसावर हल्ला करुन वाहनही फोडले
भंडाराः भंडारा जिल्ह्यामधील (Bhandara District) पवनी तालुक्यातील बेटाळा येथे बुधवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास वाळू तस्करांकडून (Sand smuggler) एसडीओंच्या पथकावर हल्ला (Attack on SDO squad) करण्यात आला. वाळू तस्करांकडून नेहमीच शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार घडत असून बुधवारीही वीस ते पंचवीस वाळू तस्करांनी एसडीओंच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात अधिकारी जखमी झाले असून त्यांना […]
भंडाराः भंडारा जिल्ह्यामधील (Bhandara District) पवनी तालुक्यातील बेटाळा येथे बुधवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास वाळू तस्करांकडून (Sand smuggler) एसडीओंच्या पथकावर हल्ला (Attack on SDO squad) करण्यात आला. वाळू तस्करांकडून नेहमीच शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार घडत असून बुधवारीही वीस ते पंचवीस वाळू तस्करांनी एसडीओंच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात अधिकारी जखमी झाले असून त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्यांच्याकडून हल्ला केला गेल्याने पोलिसही यामध्ये जखमी झाला आहे. यामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. त्यानंतर पवनी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
20 ते 25 वाळू तस्करांचा हल्ला
भंडारा जिल्ह्यामधील पवनी तालुक्यातील बेटाळा येथे बुधवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास वाळू तस्करांकडून एडीओंच्या पथकावर हल्ला करण्यात आला. 20 ते 25 वाळू तस्करांनी यावेळी एसडीओंच्या पथकावर हल्ला केला. यामध्ये एसडीओ जखमी झाले असून त्यांच्या वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत. यामध्ये वाचवायला गेलेला पोलिसही जखमी झाला असून मुजोर वाळू माफियांची दादागिरी सुरुच असल्याने त्यांच्याविरोधात पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिकारी जखमी, वाहनही फोडले
वाळू तस्करीच्या कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या (एसडीओ) पथकावर वाळू तस्करांनी बुधवारी जीवघेणा हल्ला केला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील बेटाळा येथे बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली असून यामध्ये एसडीओ जखमी झाले आहेत. तर त्यांच्या वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या असल्याने वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे एसडीएमला वाचवायला गेलेला पोलीसही यामध्ये जखमी झाला आहे. याप्रकरणी पवनी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
वाळू तस्करीच्या तक्रारी
भंडारा जिल्ह्यातील वाळूला विदर्भात मोठी मागणी आहे तर पवनी तालुक्यातील वाळू घाट लिलावात गेले नसले तरी वाळू माफिया राजरोसपणे वाळूची अवैध वाहतूक करीत आहेत. भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्याकडे वाळू तस्करीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरुन बुधवारी पहाटे ते तलाठी, पोलीस कर्मचारी असलेल्या पथकासह पवनी निलज रस्त्यावर वाहनातून गेले होते. त्यावेळी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास वाळूचे चार-पाच टिप्पर एकापाठोपाठ येताना दिसले असता टिप्परला थांबविण्याचा इशारा केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अंतरावर बेटाळाजवळ टिप्पर अडविला गेला. त्यावेळी 20 ते 25 तस्करांनी हातात काठ्या, फावडा व दगडाने जोरदार हल्ला केला. यामध्ये उपविभागीय अधिकारी राठोड जखमी झाले असून त्यांच्या वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत. या प्रकाराची माहिती पवनी पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
वाळूमाफियांची मुजोरी वाढली
येथील वाळूमाफियांची मुजोरी वाढली असून उपविभागीय अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या सहायक पोलीस निरीक्षकावरही हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर तात्काळा पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणातील नऊ संशयितांची ओळख पटली असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड .यांनी सांगितले.
…तर आज ही घटना घडली नसती
विशेष बाब म्हणजे पवनी तहसीलदार यांनी काही दिवसांपूर्वी असाच एक ट्रक पकडला होता, त्यावेळेला पोलिस उपस्थित असतानाही वाळू माफियांकडून दमदाटी करण्यात आली होती. तेव्हाच वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या असत्या तर आज ही घटना घडली नसती, पण आज झालेल्या घटनेमुळे महसूल अधिकारी, व पोलीस अधिकारी यांनीच वाळू माफियांना सूट दिल्यानेच त्यांची दादागिरी वाढली असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणात राजकीय वरदहस्तही मिळत असल्याने त्यांची दादागिरी करण्याचे प्रमाण वाढले आहे.