कासव काढण्यासाठी विहिरीत उतरले ते दोघेही परतलेच नाही, नेमकं काय घडलं?
विहिरीत पाणी कमी होते. त्यामुळे त्यांनी कासव काढण्यासाठी विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला. पण, त्याठिकाणी त्यांनी अस्वस्थ वाटू लागले.
भंडारा : पावसाचे दिवस आहेत. धो-धो पाऊस कोसळत आहे. जमिनीवरील प्राणी सक्रिय झाले आहेत. साप, विंचू, कासव, खेकडे असे प्राणी दिसत आहेत. साप पाहून बरेच लोकं घाबरतात. खेकडे हे जागोजागी छिद्र पाडताना दिसतात. काही ठिकाणी कासवासारखे दुर्मीळ प्राणी दिसतात. अशीच एक घटना लाखनी तालुक्यातील गडपेंढरीत घडली. दोन मित्र शेतावर गेले होते. त्यांना कासव दिसले. विहिरीत पाणी कमी होते. त्यामुळे त्यांनी कासव काढण्यासाठी विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला. पण, त्याठिकाणी त्यांनी अस्वस्थ वाटू लागले.
अशी आहेत मृतकांची नावं
कासव काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोघांचा विषारी वायूमुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या गडपेंढरी इथं आज सकाळी घडली. दयाराम भोंडे (वय 35 वर्षे) मंगेश गोंदळे (वय 25 वर्षे) असं दोघांचा मृत्यू झालेल्यांचं नाव आहे.
दोघांचा गुदमरून मृत्यू
विष्णू गायधने त्यांच्या शेतात भात पिकाची लागवड सुरू आहे. यासाठी लगतच्या भुगाव मेंढा येथील हे दोघं आपल्या अन्य सहकाऱ्यांसोबत शेतात आले होते. विहिरीत कमी पाणी असल्यानं त्यात दोघांचाही गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
तर अशा दुर्घटना टाळता येतील
शेताची काम सुरू आहेत. शेताला पाणी देण्यासाठी काही शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. नाल्याकाठावर शेती असणारे मोटारपंप किंवा इंजीन नाल्यावर लावतात. अशावेळी त्यांना नाल्यातही उतरावे लागते. अशा परिस्थितीत धोका घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेततळे शेतात तयार करणे गरजेचे आहे. विहिरीत उतरण्याची किंवा नाल्यात खाली उतरण्याची गरज पडत नाही. शेततळे शेतात झाल्यास अशा दुर्घटना टाळता येतील.