“शेतकऱ्यांना कृषीसाठी 12 तास वीज देणार”; उपमुख्यमंत्र्यांची शेतीसाठी मोठी घोषणा…

आगामी खरीप हंगामासाठी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त असलेले बी-बियाणे आणि रासायनिक खतांचा उपयुक्त साठा उपलब्ध असल्याचेही देवेंद्र फडणवीस यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांना कृषीसाठी 12 तास वीज देणार; उपमुख्यमंत्र्यांची शेतीसाठी मोठी घोषणा...
Image Credit source: tv 9 Marathi
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 4:36 PM

भंडारा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे अजून भरपाई मिळाली नव्हती, मात्र भाजप आणि शिवसेनेचे सरकार आल्यानंतर आम्ही सर्व नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळवून दिली असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. भंडारा येथे हंगामा संदर्भात घेतलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करत शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या घोषणेमुळे अवकाळी आणि गारपीटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हंगामा संदर्भात बैठक घेण्यात आली,

त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा मोबादला देणार असल्याचे सांगत भंडारा जिल्ह्यात भात पिकासह तूर, मका आणि सोयाबीन पिकांचे उत्पादन घेतले जाते.

त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त असलेले बी-बियाणे आणि रासायनिक खतांचा उपयुक्त साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रासायनिक खतांची उचल करण्याच्या दृष्टीने भंडाऱ्यात रॅक पॉईंट नसल्याने तुमसर येथे रॅक पॉईंट निर्माण करण्याच्या दृष्टीनेही सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी योजना माध्यमातून शेतकऱ्यांना कृषीसाठी 12 तास वीज देणार असल्याचे मोठे अश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. सोलर फिडर लावून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार असल्याचे अश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले आहे.

त्याच बरोबर 100 गावांमध्ये युक्त शिवार योजनेचे काम हाती घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सोलर फिडर लावण्यासाठी जागा खरेदी करण्यात येत असून त्यामधून सोलर फिडरसाठी शेतकऱ्यांना 50 हजार रुपय वार्षिक देण्यात येईल.

देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा येथे बोलताना सांगिते की, धान खरेदीचं वाढीव उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी जी धान खरेदी झाली त्यांचे 99 टक्के शेतकऱ्यांना चुकारे देण्यात आलेले आहे.

तर भंडारा जिल्ह्यात चार वेळेस अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान केले आहे, त्यामुले शेतकरीही हैराण झाले आहेत. त्यातील तीन वेळेचे पंचनामे झाले असून शेवटचे पंचनामे आता अंतिम टप्प्यात आहेत.

तर 2020-21 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झालेल्या नुकसानीचा अद्याप मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नसतानाही आमच्या सरकारने मात्र शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला दिल्याचे त्यांनी सांगितले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.