Bhandara accident : अंघोळीसाठी गोसेखुर्दच्या उजव्या कालव्यात उतरले, नागपूरचे दोन तरुण वाहून गेले

पवनीजवळ निलज मार्गावर गोसेखुर्दचा हा उजवा कालवा आहे. पण, कालव्याचा अंदाज त्यांना आला नाही. दोनपैकी एक जण गटांगळ्या खाऊ लागला. दुसरा त्याला वाचवायला गेला. पण, दोघांचाही पत्ता लागला नाही.

Bhandara accident : अंघोळीसाठी गोसेखुर्दच्या उजव्या कालव्यात उतरले, नागपूरचे दोन तरुण वाहून गेले
एकाला वाचविण्यासाठी दुसरा गेला, दोघेही बुडाले, भंडाऱ्यातील गोसेखुर्द कालव्यातील घटना
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 3:36 PM

भंडारा : गावोगावी जाऊन कापड विक्रीचा व्यवसाय करणारे दोन तरुण गोसेखुर्द (Gosekhurd Dam) प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात अंघोळीसाठी उतरले. अंगोळ करत असताना ते वाहून गेल्याची घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या पवनी (Pavani) येथे घडली आहे. अंघोळीसाठी कालव्यात उतरले असता एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्न केला. पण, दोघेही वाहून गेल्याचे (swept away) सांगण्यात येत आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह काही अंतरावर आढळून आला. नईम खान लाल खान (22) आणि अमिन शहा लाल शहा (22) अशी त्यांची नावं आहेत. हे तरुण सध्याचे अब्बुमियानगर, भांडेवाडी, नागपूर येथील रहिवासी आहेत.

एकाला वाचवायला दुसरा गेला तोही…

मूळचे मध्यप्रदेशातील ग्वालियर येथील रहिवासी आहेत. गेल्या काही दिवसांपासून कापड व्यवसायाच्या निमित्ताने नागपुरात राहतात. गावोगावी जाऊन कपडे विक्री करत असत. चौघेजण एका व्हॅनने पवनी येथे कापड विक्रीसाठी आले. निलज मार्गावरील गोसेखुर्द उजव्या अंघोळीसाठी नईम खान आणि अमिन खान उतरले. मात्र यापैकी एक जण पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचविण्यासाठी दुसरा गेला. कालव्यातील पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने दोघेही वाहून गेले. हा प्रकार व्हॅनमध्ये बसून असलेल्या त्यांच्या दोन साथीदारांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ पवनी पोलिसांना सूचना दिली. पवनी पोलीस घटना स्थळी दाखल होत शोध सुरु केला. यात त्यापैकी एकाचा मृतदेह काही अंतरावर आढळून आला. दुसऱ्याचा शोध अद्याप सुरु आहे. विशेष म्हणजे आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.

व्हॅनमध्ये होते चार जण

कापड विक्री करून चार तरुण परत येत होते. दिवसभर थकल्यामुळं त्यांना अंगोळ करावीसी वाटली. त्यासाठी ते कालव्याच्या पाण्यात उतरले. पवनीजवळ निलज मार्गावर गोसेखुर्दचा हा उजवा कालवा आहे. पण, कालव्याचा अंदाज त्यांना आला नाही. दोनपैकी एक जण गटांगळ्या खाऊ लागला. दुसरा त्याला वाचवायला गेला. पण, दोघांचाही पत्ता लागला नाही. ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. व्हॅनमध्ये दुसरे दोघे जण बसले होते. त्यांनी पवनी पोलिसांना कळविले. तोपर्यंत दोघेही वाहून गेले होते. शोधकार्य सुरू केल्यानंतर एकाचा मृददेह सापडला. दुसऱ्याच्या मृतदेहाचा शोध सुरू होता.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.