Bhandara : वनविभागाची गस्त पथकाच्या कारवाई, लाखो रुपयांचे सागवान सापडले, दोन ट्रक ताब्यात

दोन ट्रक सागवान सापडल्याने या मागचा खरा सुत्रधार कोण आहे, याची वनविभाग कसून चौकशी करीत आहे. त्याचबरोबर हे कधीपासून सुरु असल्याची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे.

Bhandara : वनविभागाची गस्त पथकाच्या कारवाई, लाखो रुपयांचे सागवान सापडले, दोन ट्रक ताब्यात
sagwan teak cuttingImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 8:28 AM

भंडारा : सागवान वृक्षाची (teak tree) कटाई करून वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर वनविभागाने कारवाई करून 7 लाख रुपयांचे सागवान लाकूड जप्त केले. ही घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखनी येथे घडली. वनविभागाच्या गस्ती पथकाने करून जप्त केलेले लाकूड गडेगाव डेपोत जमा करण्यात आले आहे. अचानक वनविभागाच्या (forest department) कारवाईमुळे तस्करी करणारे चांगलेचं हादरले आहेत. विशेष म्हणजे वनविभागाने दोन ट्रक ताब्यात घेतले आहेत. त्यामध्ये साधारण लाखो रुपयांचे सागवान सापडले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणातला खरा सुत्रधार कोण याचा पोलिस शोध घेत आहेत.

25 लाखांचा मुद्देमाल जप्त

लाखनी वनविभागाच्या गस्ती पथकाला ट्रकमधून सागवान लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून ट्रक (क्र. एमएच 40 एके-5317 व एमएच-40 सीडी 0413) यांना थांबवून तपासणी केली असता. 7 लाख रुपयांची सागवान लाकडे भरलेली दिसली. वाहनचालकाजवळ परवाना नसल्याने दोन्ही ट्रक जप्त करून गडेगाव आगारात जमा करण्यात आले आहेत. 7 लाख रुपयांचा सागवान लाकूड व दोन ट्रक असा 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रकच्या खऱ्या मालकाचा शोध सुरू असून ट्रकच्या मालकाला अटक करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या मागचा खरा सुत्रधार कोण आहे ?

दोन ट्रक सागवान सापडल्याने या मागचा खरा सुत्रधार कोण आहे, याची वनविभाग कसून चौकशी करीत आहे. त्याचबरोबर हे कधीपासून सुरु असल्याची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे. ट्रकच्या मालकांचा शोध लागल्यानंतर अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर ताब्यात घेतलेल्या झाडांची सुध्दा चाचणी करण्यात येणार आहे. कारवाई झाल्यामुळे झाडांची तस्करी करणारे चांगलेचं हादरले असल्याची चर्चा भंडारा जिल्ह्यात आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाडांची तस्करी केली जात असल्याचं वारंवार उघडकीस आलं आहे.  त्याचबरोबर वनविभागाने कारवाई सुध्दा केली आहे.  कारवाई होत असून तस्करी केली जात आहे.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.