Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara Forest | महिला रोहयोच्या कामावर, रानडुकराच्या हल्ल्यात चार महिला जखमी; कोका शिवारातील घटना

सध्या रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. कोका येथे या कामावर महिला गेल्या होत्या. रानडुकरानं हल्ला करून चार महिला मजुरांना जखमी केले. जमखींना भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Bhandara Forest | महिला रोहयोच्या कामावर, रानडुकराच्या हल्ल्यात चार महिला जखमी; कोका शिवारातील घटना
कोका जंगलात रानडुकराने चार महिलांना जखमी केले. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 9:23 AM

भंडारा : रोजगार हमी योजनेच्या (Employment Guarantee Scheme) कामावर असलेल्या मजुरांवर रानडुकराने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना भंडारा तालुक्यातील कोका येथे घडली. तिघींही भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एका महिलेला उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. कोका येथील रेखा सीताराम खेताडे (वय 45), शारदा मोहन रहाटे (वय 47), मंदा नेवारे (वय 40 वर्ष) अशी जखमींची नावे आहेत. भंडारा तालुक्यातील कोका येथे महिनाभरापासून रोजगार हमी योजनेंतर्गत शिंगारी बोडी खोलीकरणाचे काम सुरू आहे. सकाळच्या सुमारास मजूर जंगलालगतच्या बोडीवर कामावर गेले होते. कामाला सुरुवात झाली होती. झुडपात लपून असलेल्या रानडुकराने मजुरांवर हल्ला (attacked the laborers) केला.

तिघींच्या कंबरेला व पायाला गंभीर दुखापत

यात रेखा, शारदा व मेघा या गंभीर जखमी झाल्या. तिघींच्याही कंबरेला, पायाला व पोटाला जबर दुखापत झाली. घटनेची माहिती होताच ग्रामस्थांनी धाव घेत मजुरांच्या मदतीने दोघींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यानंतर भंडारा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

कोका हे जंगलातील गाव

कोका हे गाव जंगलात आहे. त्यामुळं वन्यप्राण्यांची नेहमी भीती असते. घरी राहून काम भागत नाही. शेतीची कामे झाली की, लोकं रोहयोच्या कामावर जातात. त्यातून त्यांना रोजगार मिळतो. शिंगारी बोडीच्या कामावर या महिला गेल्या होत्या. हे ठिकाणही जंगलातच आहे. रानडुकराने डाव साधून हल्ला केला. महिलांना झुडपातून रानडुक्कर येईल, याची कल्पना नव्हती. त्यामुळं त्या बिनधास्त होत्या. पण, अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं त्यांना चांगलीच जखम झाली. आता जखमींवर उपचार सुरू आहेत. पण, वनात जंगली प्राण्यानं हल्ला केल्यास जखमींना नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. यातून जखमींना नुकसान भरपाई देण्याची यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

धक्कादायक! परळ डेपोजवळ बेशुद्धावस्थेत आढळले, मुंबईत एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

Gadchiroli | प्रेयसीची हत्या करुन मृतदेह पुरला, गडचिरोलीत माजी सरपंचाचा मुलगा गजाआड

Nashik CCTV | विनाहेल्मेट पेट्रोल का दिले नाही, नाशकात बाईक चालकाचा पंपावर राडा, कर्मचाऱ्यांशी बाचाबाची

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.