Video : Bhandara tree burn | भंडाऱ्यात वीज पडली, झाड जळालं, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद!
घराबाहेर विजांचा लखलखाट होताना दिसतो. काळ्याकुट्ट अंधारात झाड जळत आहे. ढगांचा गडगडाट ऐकू येत आहे. झाड पेटताना पाहून गावकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. पुन्हा विजांचा लखलखाट दिसत आहे. घराच्या खिडकीतून हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर (tumsar) तालुक्यातील देव्हाडी एका झाडावर वीज पडली. त्यानंतर झाड जळाल्याची घटना घडली. हे थरारक दृश्य देव्हाडी एका व्यक्तीने कॅमेरात कैद केले. हवामान खात्याने भंडारा जिल्ह्यात 18 जून ते 21 जूनपर्यंत विजेच्या गडगडासह पावसाच्या हजेरीचा अंदाज वर्तविला. तो अंदाज आता खरा होताना दिसत आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथेही विजेच्या गडगडासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक एक वीज झाडावर कोसळली. त्यानंतर अख्ख झाड जळालं. विशेष म्हणजे वीज पडल्याने एकच स्फोटासारखा (explosion) आवाज झाला. गावात अंधाराचे (darkness) साम्राज्य पसरले होते.
पाहा व्हिडीओ
भंडाऱ्यात वीज पडून झाड पेटले pic.twitter.com/02ffcmndau
हे सुद्धा वाचा— Govind Hatwar (@GovindHatwar) June 19, 2022
व्हिडीओत नेमकं काय
घराबाहेर विजांचा लखलखाट होताना दिसतो. काळ्याकुट्ट अंधारात झाड जळत आहे. ढगांचा गडगडाट ऐकू येत आहे. झाड पेटताना पाहून गावकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. पुन्हा विजांचा लखलखाट दिसत आहे. घराच्या खिडकीतून हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. हे चित्र कैद करताना थरारक दृश्य पाहून गावकरी थरारले. अशी घटना कधी पाहिली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
विजेच्या धक्क्याने आसगावात मुख्याध्यापकाचा मृत्यू
बंद पडलेला टिल्लू मोटरपंप सुरू करण्याच्या प्रयत्नात विजेचा जबर धक्का लागला. यात मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील आसगाव येथे घडली. पवनी तालुक्यातील आसगाव येथील विजय कृष्णाजी विश्वेकर (वय 54 वर्षे) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या घरचा पाण्याचा टिल्लू मोटारपंप बंद पडला होता. ते सुरू करण्यासाठी त्यांनी मोटरचे पाते फिरविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना अचानक विजेचा जबर धक्का लागला. खाली कोसळून बेशुद्ध पडले. ही घटना घडल्याचे माहीत होताच गावकऱ्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली. त्यांना तत्काळ पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासताच मृत घोषित केले. ते लाखांदूर तालुक्यातील घरतोडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या दुर्देवी मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.