मंगल कार्यालय बूक करताना, पत्रिका छापताना वर-वधूचं वय तपासा अन्यथा; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश
2 वर्षाचा सश्रम कारावास व 1 लाख दंड भोगावा लागणार आहे. त्यामुळे नियमानुसार वागा नाहीतर कारवाईला सामोरे जावे लागेल.
भंडारा : बालविवाह मुक्त करण्यासाठी भंडारा जिल्हाधिकाऱ्याचा कठोर आदेश दिले. आता मुला-मुलीच्या वयाची खात्री न करता लग्नाच्या हॉलचे बुकिंग केल्यास महागात पडेल. पत्रिकेची छपाई, बँड पथक, आचारी, फोटोग्राफर यानी बुकिंग घेतल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. आता मुलाचे वय 21 व मुलीचे वय 18 पूर्ण झाल्याची खात्री करून बुकिंग घेणे सक्तीचे करण्यात आले. तुम्ही हॉल मालक, प्रिटिंग प्रेसचे मालक, अथवा तुम्ही बँड पथक, आचारी, फोटोग्राफर आहात का. तुम्ही मुला-मुलीचे वय न तपासात लग्नाचे ऑर्डर घेत आहात तर सावधान? होय, तुम्हाला जेल ही हवा खावी लागू शकते. कारण भंडारा बालविवाह मुक्त करण्यासाठी भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नुकताच कठोर आदेश पारित केला.
असा ठपका ठेवला जाणार
आता मुलाचे वय 21 व मुलीचे वय 18 पूर्ण झाल्याची खात्री करणे गरजेचे आहे. लग्न कार्यास लग्नाचे बुकिंग घेणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे आता मुला-मुलीचे वयाची खात्री केल्याशिवाय लग्नाच्या हॉल-मंगल कार्यालयचे बुकिंग तसेच पत्रिकेची छपाईचे बुकिंग, बँड पथक, आचारी फोटोग्राफर याचे बुकिंग घेता येणार नाही. त्यामुळे एखाद्या बालविवाह घडल्यास आता बालविवाहास सहकार्य केल्याचा ठपका ठेवत लग्नाचे बुकिंग घेतल्या प्रकरणी कडक कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत. आता लग्नाचे बुकिंग घेते वेळी उपवर-वधुचे वय तपासा. अन्यथा तुम्हाला कारवाईला सामोर जावे लागणार आहे. 2 वर्षाचा सश्रम कारावास व 1 लाख दंड भोगावा लागणार आहे. त्यामुळे नियमानुसार वागा नाहीतर कारवाईला सामोरे जावे लागेल. अशी माहिती बालसंरक्षक अधिकारी नितीनकुरमार साठवणे यांनी दिली.
ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना माहिती कशी होईल?
भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही बालविवाह होतात. मागास समाजामध्ये अशा काही मोजक्या घटना घडतात. पण, त्यासाठी ते हॉल बुकिंग करत नाहीत. झोपडपट्टीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह गुपचूप पार पाडला जातो. त्यामुळे ग्रामीण प्रशासकीय यंत्रणा अलर्ट असणे गरजेचे आहेत. ग्रामीण भागातील बहुतेक सरकारी कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे त्यांनासुद्धा अशा गुपचूप होणाऱ्या विवाहाची भनक लागत नाही. या आदेशाचा कितपत उपयोग होतो, हे येणारी वेळच सांगेल.