भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील (Tumsar) परसवाडा (paraswada) येथील परमपूज्य संत नाना महाराज द्वारा जनकल्याण स्थापित 49 व राष्ट्रीय वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . निःशुल्क गरीब लोकांसाठी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामूहिक विवाह सोहळ्यात सर्वधर्मीय 11 विवाह जोडपी विवाहबद्ध झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराची विदेशी पाहुणे सुद्धा या सामूहिक विवाहमध्ये उपस्थित होते.
विदेशी पाहुण्यांनी यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवप्रवासावर प्रकाश टाकला. यावेळी जोडप्यांना विदेशी पाहुण्यांच्या हस्ते आंदण सुद्धा देण्यात आले. गावात विदेशी पाहुणे आल्याने उपस्थित वऱ्हाडीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मोठ्या संख्येने गुरुदेव सेवा मंडळातील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते अशी माहिती नाना महाराज कांबळे यांनी दिली.
महाराष्ट्रात विविध ठिकाणी सामूहिक विवाहाचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे सामूहिक पद्धतीने विवाह सोहळ्याला अनेकजण उपस्थित राहतात. त्याचबरोबर वधू-वरांना अर्शिवाद सुद्धा देतात. कालच्या लग्नात विदेशी पाहुण्यांनी हजेरी लावल्यामुळे वऱ्हाडी मंडळी एकदम खूश असल्याची पाहायला मिळत होती.