खिशात मोबाईलचा स्फोट, भंडारा जिल्हा हादरला; शिक्षकाचा मृत्यू, वृद्ध जखमी
Mobile Explosion in Bhandara : जीवनशैलीत मोबाईल ही अत्यावश्यक वस्तू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोबाईल स्फोटाच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. या घटनेत कुणाचा जीव जातो, तर कोणी गंभीर जखमी होते. अशीच घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. मोबाईलचा स्फोट झाल्याने एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे.
भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेवेळी शिक्षकाच्या शेजारी बसलेल्या वृद्धाला पण गंभीर दुखापत झाली आहे. गंभीर जखमी वृद्धावर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत .सुरेश संग्रामे असे मयत शिक्षकाचे नाव आहे. तर नत्थू गायकवाड असे जखमी वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. मयत शिक्षक आणि जखमी वृद्ध हे दोघेही नातेवाईक आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमासाठी जाताना खिशात हा स्फोट झाला. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
…अन् कार्यक्रमावर दु:खाचे सावट
मयत शिक्षक सुरेश संग्रामे हे साकोला तालुक्यातील सिरेगावटोला येथील रहिवाशी आहेत. अर्जुनी मोरगाव येथे नातेवाईकांचा एक कार्यक्रम होता. ते नातेवाईक नत्थू गायकवाड यांच्यासह या कार्यक्रमाला जात होते. संग्रामे यांचा मोबाईल खिशात होता. नातेवाईकाकडे जात असताना त्यांच्या खिशातील मोबाईलचा स्फोट झाला. त्यात संग्रामे यांचा जागीच मृत्यू झाला. तर गायकवाड हे गंभीर जखमी झाले.
या स्फोटामुळे संग्रामे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला तर इतर नातेवाईकाच्या कार्यक्रमावर दु:खाचे सावट पसरले. या घटनेने नातेवाईकांना धक्का बसला. त्यांना दोघांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहे. मोबाईलची बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.
या चुका टाळा
तुमचा स्मार्टफोन दुरुस्तीसाठी अधिकृत सेवा केंद्रावरच द्या
स्मार्टफोनची बॅटरी फुगली तर नाही ना, ती नादुरुस्त असल्यास त्वरीत बदलवा
बॅटरी ओरिजनल आहे की नाही, हे तपासा
दुसऱ्या फोनच्या चार्जरने तुमचा फोन चार्जर करू नका. लोकल चार्जरचा वापर करू नका
फोन रात्रभर चार्जिंगला लावून ठेवू नका
फोन जास्त गरम लागत असेल तर त्वरीत सेवा केंद्र, दुरुस्ती केंद्रावर दाखवा
फोनचा अतिरेकी वापर टाळा, फोनमध्ये बिघाड असल्यास त्याचा वापर करू नका