भंडारा : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून, फरार झालेल्या पतीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विलास धनराज मेश्राम वय 35 वर्ष, राहणार पांढराबोडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र त्याचा शोध लागत नव्हता. तो शहरातील खात रोड परिसरातील शेतशिवारामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसरात छापा टाकून आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विलास मेश्राम हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत होता. त्यातूनच त्यांच्यामध्ये वारंवार खटके उडत होते. यातूनच त्यांने आपली पत्नी बबीता मेश्राम वय 27 वर्ष राहणार नेहरू वॉर्ड मेंढा, मुळ गाव पांढराबोडी हिचा साडीने गळा आवळून खून केला. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीच्या तपासाला सुरुवात केली होती.
पोलीस आरोपी पतीचा शोध घेत होते, मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता. मेश्राम हा खात रोड परिसरातील शेतशिवारामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी खात रोड परिसरातून आरोपीला अटक केली आहे. संबंधित प्रकरणाबाबत अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुग्धजन्य पदार्थांमधून विषबाधा; दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू
नाशिक हादरले! किरकोळ वादातून तरुणाची हत्या; आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात
Nagpur Crime | जीवन नकोसे झाले! विष घेऊन गळफास; 20 दिवस व्हेंटिलेटवर तरीही तुटली नाही आयुष्याची दोरी