प्रशासकीय अधिकारी ते राजकारणी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे यांचा प्रवास

प्रशासकीय सेवेतील अनुभव मी राजकारणात नक्की करेन. याचा फायदा सामान्य नागरिकांना करून देईल, अशा विश्वास प्रकाश बाळबुधे यांनी व्यक्त केला.

प्रशासकीय अधिकारी ते राजकारणी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे यांचा प्रवास
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 10:35 PM

भंडारा : भाजपाने शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. यात भंडारा जिल्ह्यातही बदल करण्यात आलेत. शिवराज गिऱ्हेपुंजे हे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ संपला. आता नवे भाजपचे भंडारा जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रकाश बाळबुधे यांची निवड करण्यात आली आहे. प्रकाश बाळबुधे हे आधी प्रशासकीय सेवेत होते. विक्रीकर आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं. त्यावेळी त्यांनी मंत्र्यांचे पीए म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. विक्रीकर आयुक्त पदाचा राजीनामा देऊन ते राजकारणात आले. साकोली येथे स्मार्ट व्हिलेजची स्थापना त्यांनी केली. त्या माध्यमातून ग्रामीण भागात पोहचले. यापूर्वी ते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष होते. आता भाजपचे भंडारा जिल्हाध्यक्षपद माजी विक्रीकर उपायुक्त प्रकाश बाळबुधे यांना मिळालं. प्रशासकीय सेवेतील अनुभव मी राजकारणात नक्की करेन. याचा फायदा सामान्य नागरिकांना करून देईल, अशा विश्वास प्रकाश बाळबुधे यांनी व्यक्त केला.

विशेष म्हणजे प्रकाश बाळबुधे यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यासोबत मंत्री असताना 5 वर्षे काम केले आहे. मुंबईत अनेक वर्ष विक्रीकर उपायुक्त म्हणून प्रकाश बाळबुधे यांनी काम केले आहे. आपल्या नोकरीचा राजीनामा देत 2014 पासून राजकारणात सक्रिय झाले.

प्रशासकीय अधिकारी ते राजकारणी

रावसाहेब दानवे यांच्या राजकारणातील अनुभव बघून याचा फायदा मी भंडारा जिल्ह्यात करेन. हीच माझ्यासाठी शिदोरी असल्याचं मत प्रकाश बाळबुधे यांनी व्यक्त केलं. भाजपचे उपाध्यक्ष असताना लोकांच्या कामासाठी ते मुंबईत मंत्रालयात जात असायचे. ग्रामीण भागात राहून मंत्रालयात जाऊन प्रकाश बाळबुधे यांनी लोकांची काम केली. भाजपचे जिल्हा अध्यक्ष पद मिळाल्यानंतर आमदारकीची तिकीट मिळवण्याचा ते प्रयत्न करतील, असं त्यांच्या बोलण्यातून जाणवते.

भाजपचा उमेदवार जिंकवण्याचा प्रयत्न करू

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे विधानसभा क्षेत्रापासून लांब असतात. त्यामुळे त्यांचे स्वताच्या मतदारसंघात लक्ष नाही. ते मुंबईच्या कामातच व्यस्त असतात. 1999 पासून नाना पटोले आमदार आहेत. या अगोदर खासदार होते. पण त्यांनी मतदारसंघात काहीच केलं नाही. त्यामुळे आम्ही निवडणुकीत हा मुद्दा घेऊन भाजपच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे यांनी व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.