भंडारा : जिह्यातल्या लाखनी (Lakhni) तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला. शिवनी मोगरा (Shivani Mogra) येथील गुराखी जनावरं चारायला गेले होते. एका झाडाखाली असताना वीज कोसळली. यात पिसाराम चचाणे यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेली दोन बालकं जखमी झाली. जिल्ह्यात सध्या आकाश ढगाळलेलं आहे. काही ठिकाणी रिमझीम पावसाच्या सरी बरसल्या. काही भागात विजा चमकल्या. अशात गुरे चारायला घेऊन गेलेल्या गुराख्याच्या वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर, दोन बालकं गंभीर जखमी झालेत. पिसाराम चचाने (Pisaram Chachane) (वय 60 वर्षे) यांचा मृत्यू झाला, तर क्रांतिवीर सुभाष गरपडे (वय 12 वर्ष) व छकुली राजू नेवारे (वय 10) हे दोघे जखमी झाले. पिसाराम गायी चारण्यासाठी, तर दोन्ही बालके शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले होते.
शेळ्या, गायी राखण्यासाठी शेतशिवारात गेले होते. तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. पिसाराम व दोन बालकांनी एका झाडाखाली आश्रय घेतला. दरम्यान अचानक वीज कोसळली. पिसाराम चचाने व दोन्ही बालके गंभीररीत्या भाजली गेलीत. तिघांनाही गावकऱ्यांनी लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी पिसाराम यांना मृत घोषित केले. हिमांशी आणि क्रांतिवीर यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची माहिती पोलीस व महसूल प्रशासनाला देण्यात आली. पंचनामा करण्यात आला. पिसाराम यांच्या दुर्देवी मृत्युने गावात शोककळा पसरली आहे.
वातावरण बिघडले आहे. पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसासोबत विजाही चमकतात. अशावेळी विजांपासून संरक्षण व्हावे, म्हणून गुराखी एखाद्या झाडाचा आश्रय घेतात. या झाडावरच वीज कोसळल्यानं झाडाखाली आश्रयाला असलेली दोन बालकं जखमी झाली. तर एकाचा मृत्यू झाला. त्यामुळं घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेऊन पडणे गरजेचे आहे. सध्या विजांच्या कडकडात आला, तर अशावेळी शक्यतो घरी सुरक्षित ठिकाणी राहावे.