पोलीस कोंबड्यांची झुंज करायला लागले; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी केली ही कारवाई
पोलीस कर्मचारी कोंबड्यांच्या झुंजीत मश्गुल असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेत पोलीस अधीक्षकांनी पोलिसांवर बदलीची कारवाई केली.
भंडारा : कारवाई करायला गेलेल्या लाखांदूर पोलिसांना कोंबड्यांची झुंज बघण्याच्या मोह चांगलाच भोवला. झुंज बघण्याच्या व्हिडीओ व्हायरल झाल्यावर यांची दखल भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी घेतली. संबंधित तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली. यात लाखांदूर बिट जमादार वकेकर, बिट जमादार भोयर व एएसआय नैताम यांच्या समावेश आहे. आता या व्हिडीओ प्रकरणाची चौकशी पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत सुरू झाली. साकोली उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत सिंग या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या चौकशीत काय निष्पन्न होते. दोषी पोलिसांवर काय कारवाई होते हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. ही घटना जुलै महिन्यातील आहे. हे पोलीस कारवाईसाठी गेले होते.पण, त्यांनी काही कारवाई केली नव्हती, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.
या तीन जणांची मुख्यालयात बदली
लाखांदूर पोलीस ठाण्यातील तीन कर्मचार्यांचा कोंबड्यांची झुंज लावत असतानाचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला. झुंज बघण्याच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी तात्काळ लाखांदूर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार नेताम, बीट जमादार वकेकर, भोयर यांची बदली जिल्हा पोलिस मुख्यालयात केली आहे. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकार्यांमार्फत सुरू झाली आहे. या चौकशीअंती सदर कर्मचार्यांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागून आहे. बुधवारी जिल्ह्यात नागपूर पोलीस महानिरीक्षकांची उपस्थिती होती. त्यातच पोलीस कर्मचारी कोंबड्यांच्या झुंजीत मश्गुल असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेत पोलीस अधीक्षकांनी पोलिसांवर बदलीची कारवाई केली.
अवैध धंदे पुन्हा फोफावताहेत
जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर लोहित मतानी यांनी जिल्ह्यातील अवैध व्यावसायीकांना सर्वप्रथम लक्ष्य केले. सर्व अवैध धंदे बंद झाले. याशिवाय पोलिस अधीक्षकांनी नागरिकांना आवाहन करीत अवैध धंद्यांची माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांकसुद्धा जारी केला होता. सुरुवातीला या मोहिमेला बर्यापैकी प्रतिसाद मिळाला. अवैध धंदे करणारेही शांत झाले होते. परंतु, आता पुन्हा या अवैध धंद्यावाल्यांनी डोके वर काढले आहे. गावठी दारु, सट्टा, कोंबड बाजार, अवैश रेती वाहतूक आदी व्यवसाय कुठे खुलेआम तर कुठे छुप्या पद्धतीने सुरू आहेत. लाखांदुरात घडलेला प्रकार हा अशातलाच आहे.