भुतांच्या गोष्टी तर कोकणात होतात, मग भंडाऱ्यात लोकं का घाबरली? CCTV तही भुताटकी दिसल्याचा दावा

पोहरा गावात मागील 25 दिवसांपासून रात्रीच्या सुमारास कोणी तरी अज्ञात व्यक्ती येतो. महिलांची छेड काढतो. पुरुषांनाही त्रास देतोय. सुरुवातीला कोणी तरी खोडसर व्यक्ती मस्करी करत असल्याचा भास गावकऱ्यांना झाला. मात्र हा प्रकार दिवसेंदिवस गावातील नागरिकांसोबत घडतोय.

भुतांच्या गोष्टी तर कोकणात होतात, मग भंडाऱ्यात लोकं का घाबरली? CCTV तही भुताटकी दिसल्याचा दावा
भंडारा जिल्ह्यातील पोहरा येथे दहशत.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 8:00 PM

भंडारा : रात्रीस खेळ चाले (Ratris Khel chale) मालिकेनं भूतं आणि भुताटकी यावर लक्ष वेधलं. अनेक भयपटही कोकणातच चित्रित गेल्याचा इतिहास आले. कोकणात देवदेवस्की, भुतं असे किस्से रंगवून रंगवून सांगितले जातात. भुतांचं कार्यक्षेत्र जणू काही कोकणच आहे, अशा चर्चा रंगवल्या जातात. पण अशा सगळ्यात इकडे विदर्भातील एका जिल्ह्यात चक्क भुतांचं भय दिसून आलं आहे. याचं नेमकं कारण काय? असं नेमकं भंडाऱ्यात घडलं काय, याचीही चर्चा रंगली आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील एका गावात भूत असल्याचा दावा केला जातोय. ही भुताटकी सीसीटीव्हीमध्येही कैद झाल्याचं सांगितलं जातंय. त्याचा व्हिडीओही समोर आला आहे. त्यामुळे तुम्ही जर भंडाऱ्यातील पोहरा गावात जात असाल तर सावधान! पोहरा गावात रात्री 12 नंतर रात्रीचा खेळ सुरू होतो. ऐकूण थरकाप उडाला ना? तर ऐका! भंडारा जिल्ह्याच्या लाखनी (Lakhni) तालुक्यातील पोहरा गावात रात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीनं धूमाकुळ घातलाय.

त्यामुळं नागरिकांमध्ये दहशत (Terror) पसरली आहे. कोणी ह्याला चोर तर कोणी भूत तर नव्हे अशी शंका व्यक्त करतात. आता त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी रात्रीच्या सुमारास गावकऱ्यांनी लाठ्या काठ्या घेऊन गावभर फिरत जागता पहारा सुरू केला आहे. त्यामुळे जर तुम्ही रात्रीच्या सुमारास पोहरा गावातून गेले तर गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागेल.

पोहरा गावात मागील 25 दिवसांपासून रात्रीच्या सुमारास कोणी तरी अज्ञात व्यक्ती येतो. महिलांची (Women) छेड काढतो. पुरुषांनाही त्रास देतोय. सुरुवातीला कोणी तरी खोडसर व्यक्ती मस्करी करत असल्याचा भास गावकऱ्यांना झाला. मात्र हा प्रकार दिवसेंदिवस गावातील नागरिकांसोबत घडतोय. गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

200 लोकांचा ग्राम रक्षक दल तयार

घरांमध्ये कोण कधी येईल, या भीतीपोटी महिला-पुरुष रात्रीला लाठ्या-काठ्या घेऊन गावभर पहारा देतात. विशेष म्हणजे एका अज्ञात व्यक्ती दिसल्यावर गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग सुध्दा केला. मात्र काही वेळातच तो व्यक्ती अदृश्य झाल्याने गावकऱ्यांमध्ये आणखी भीतीने घर केलं. कोणी भूत तर नाही म्हणून गावकरी अजून चिंतेत पडले आहे. दरम्यान, चोर असता तर चोरी करून पसार झाला असता. मात्र हा अज्ञात व्यक्ती महिलांची छेळ काढून पसार असल्याचा दावा गावकरी करत आहेत. याच भीतीने गावातील तरुणांनी पुढाकार घेत 200 लोकांचा ग्राम रक्षक दल तयार केला आहे. आता हा लाठ्या काठ्यांनी सज्ज दल गावात रात्री जागता पहारा देत आहे. त्यामुळे पोहरा गावातील लोक रात्री येणाऱ्या लोकांना संशयी नजरेने बघू लागले आहेत. त्याचा परिणाम की काय दोन दिवसांपूर्वी गावात एक पाहुणा आला त्याला चोर समजून गावकऱ्यांनी बदडून काढल्याची घटना घडली.

पाहा सीसीटीव्ही फुटेज

मानसिक रुग्ण असल्याची शक्यता

गावात इतकी भीती निर्माण झाली आहे की गावकऱ्यांनी पोलिसात धाव घेत अज्ञात आरोपी विरूद्ध तक्रार सुद्धा दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीच्या अनुषंगाने गावात गस्तही दिली. पण चोर काही गवसला नाही. मग काय आता गावात भूत आल्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती गावात येणारच. या समितीच्या वतीने गावात लोकांना समजूत घालण्यात आली आहे. हा भूत नसून कोणी मानसिक रोगी व्यक्ती असल्याच्या दावा त्यांनी केला आहे. कोणी तरी गावकऱ्यांना त्रास देण्याच्या बहाण्याने गावात दहशत माजवत असल्याचा समिती सदस्य सांगत फिरत आहेत. विष्णुदास लोणारे व नरहरी नागलवाडे यांनी असं सांगितलं.

NCP’s mission | राष्ट्रवादी काँग्रेसचं मिशन विदर्भ! पश्चिम विदर्भात शरद पवार घेणार शिबिर, जयंत पाटलांची माहिती

Sujat Ambedkar: ‘सुशिक्षित’ असून चालत नाही ‘सुजाण’ सुद्धा असावं लागतं, मनसे, हिंदू महासंघाचा सुजात आंबेडकरांवर निशाणा

Sushil Kumar Shinde: यूपीएच्या अध्यक्षपदासाठी पवारांचे नाव चर्चेत, पण जागा खाली नाहीये; सुशीलकुमार शिंदेंचा टोला

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.