Digital School : भंडाऱ्याच्या तरुणाने फेडले आईचे ऋण, तेरवीच्या कार्यक्रमाऐवजी गावातील शाळेला दिली ही भेट

मृत्यूनंतर तेराव्या दिवशी गावातील लोकांना तेरवीच्या कार्यक्रमाचे भोजन देण्याची परंपरा आहे. पण त्या परंपरेला फाटा देत त्यानं तेरवीचा कार्यक्रम रद्द केला. तेरवीच्या कार्यक्रमाचा खर्च शाळाला डिजीटल करण्यासाठी वापरला.

Digital School : भंडाऱ्याच्या तरुणाने फेडले आईचे ऋण, तेरवीच्या कार्यक्रमाऐवजी गावातील शाळेला दिली ही भेट
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 4:36 PM

मरावे परी किर्ती रुपी उरावे, असं म्हणतात. आईचे निधन झाल्यानंतर मुलानं आईच्या नावानं शाळेला दान दिलं. यातून शाळेत शिक्षणाचा दर्जा (Quality of education) सुधारणार आहे. पारंपरिक रितीरिवाजाला फाटा देत त्यानं हे पाऊल उचललं. विशेष म्हणजे आईनं मला शिकविलं म्हणून मी परदेशात जाऊन नोकरी करू शकतो. चांगले पैसे कमवू शकतो. गावातील मुलांनीही असं शिकावं मोठं व्हावं, असा यामागचा मुलाचा उद्देश. हा उद्देश भंडारा जिल्ह्यातील धोप (Dhop) या खेडेगावात सार्थकी लागला. कारण मुलांना शिकण्यासाठी डिजीटल शाळा (Digital School) तयार झाली.

परंपरेला दिला फाटा

मोहाडीवरून दहा किमी अंतरावर असलेल्या धोप गावातील रहिवासी गुरुदेव शेंडे. त्याची आई 67 वर्षीय यशोदा हिरालाल शेंडे यांचे 24 जुलै रोजी निधन झाले. मृत्यूनंतर तेराव्या दिवशी गावातील लोकांना तेरवीच्या कार्यक्रमाचे भोजन देण्याची परंपरा आहे. पण त्या परंपरेला फाटा देत त्यानं तेरवीचा कार्यक्रम रद्द केला. तेरवीच्या कार्यक्रमाचा खर्च शाळाला डिजीटल करण्यासाठी वापरला.

शाळेला मिळाले संगणक, प्रोजेक्टर

धोप गावातील जिल्हा परिषद शाळेला मदत केली. यासाठी गुरुदेवनं आपले भाऊ शशिकांत हिरालाल शेंडे, उमेश हिरालाल शेंडे यांचे मत विचारले. त्यानंतर सर्वाचे एकमत झाले. गावातील जिल्हा परिषद शाळेला डिजीटल शाळा करण्यासाठी एक लाख रुपयांची मदत केली. आता या पैशाने शाळेला संगणक, प्रोजेक्टर आदी सुविधा मिळाल्या. गुरुदेव शेंडे या तरुणाने नक्कीचे आईचे ऋण फेडले. त्याच्या आईचे नाव आता सतत स्मरणात राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

जिल्हा परिषदेला शाळेचा फायदा

लोकं तेरवीच्या कार्यक्रमात पैसे खर्च करतात. लोकांना जेऊ घालतात. हेच पैसे असे गुरुदेवने शिक्षणाच्या कामात लावले. याचा गावातील शाळेला फायदा होणार असल्याचं मुख्याध्यापक मनोहर भगत व उपसरपंच तुलसी मोहतुरे यांनी सांगितलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.