Bhandara flood : भंडाऱ्यातील खासदारांच्या पत्नी पूरबाधितांसाठी धावल्या, धनेगावात शुभांगी मेंढेंकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पाणी ओसरल्याने याचा आढावा घेण्यासाठी खासदार मेंढे गेले. लवकरच प्रशासनाला पंचनामे करायला भाग पाडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.

Bhandara flood : भंडाऱ्यातील खासदारांच्या पत्नी पूरबाधितांसाठी धावल्या, धनेगावात शुभांगी मेंढेंकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
धनेगावात शुभांगी मेंढेंकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 3:45 PM

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या धनेगावात खासदार सुनील मेंढे यांच्या पत्नी शुभांगी मेंढे (Shubhangi Mendhe) यांच्याकडून पूर बाधितांना धिराची पेटी वाटप केली. या पेटीत जीवनावश्यक वस्तूंची सोय करण्यात आली आहे. तुमसर तालुक्यातील धनेगाव (Dhanegaon in Tumsar Taluka) येथील तलाव ओव्हरफ्लो झाल्याने गावात पाणी शिरले होते. बेघर झालेल्या विस्थापितांना वनविभागाच्या (Forest Department) राहुट्यामध्ये ठेवण्यात आले आहे. या पीडितांची खासदार सुनील मेंढे यांच्या सौभाग्यवती शुभांगी मेंढे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी बाधित 30 कुटुंबांना एक-एक पेटी भेट देत त्यात जीवनावश्यक साहित्य दिले. ही भेट पूरग्रस्तांसाठी धीर देणारी नक्कीच ठरणारी आहे.

नुकसान भरपाईचे आश्वासन

भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांनी पावसाचे पाणी साचल्याने निर्माण झालेल्या पूरग्रस्त मोहाडी शहरात रात्रीच्या सुमारास भेट दिली. झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. भंडारा जिल्ह्यात मागील 3 दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे मोहाडी तालुक्यातील नदी, नाले ओसांडून वाहू लागल्याने नदी, नाल्यातून पावसाचे पाणी मोहाडी शहरात शिरले. त्यामुळे मोहाडी शहरात सखल भागात पाणी साचल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. यात अनेकांच्या घरात, शेतात पाणी साचल्याने प्रचंड नुकसान झाले. दरम्यान पाणी ओसरल्याने याचा आढावा घेण्यासाठी खासदार मेंढे गेले. लवकरच प्रशासनाला पंचनामे करायला भाग पाडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.

हे सुद्धा वाचा

पूर ओसरला, पंचनामे सुरू

भंडारा जिल्हाला आलेला पुराचा धोका टळला. अखेर 78 तासानंतर वैनगंगा नदी शांत झाली. पुराचे पाणी ओसरल्याने नदीने आपली सामान्य पाणी पातळी गाठली आहे. त्यामुळे पुराचा धोका आता टळला आहे. भंडारा आणि कारधा नदीला जोडणारा जुना ब्रिटिशकालीन पुलावरील पाणीही ओसरले. जिल्ह्यात या पुराचा 40 गावांचा हा पुराचा फटका बसला. 3 हजारच्या वर लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची वेळ आली. मात्र आता पूर ओसरल्याने हळूहळू सर्व स्थिती पूर्व पदावर येणार आहे. पूर ओसरल्याने जिल्हा प्रशासनद्वारे युद्ध पातळीवर पंचनामे सुरू झाले आहेत.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.