नितीन राऊत यांच्या भेटीला काँग्रेस अध्यक्ष; जखमी झाल्यांनी विचारपूस करण्यासाठी पोहचले रुग्णालयात…
भारत जोडो यात्रेत नितीन राऊत सहभागी झाले होते, मात्र कार्यक्रमावेळी त्यांना धक्का लागून खाली पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
नवी दिल्लीः सध्या भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक, नेते आणि कार्यकर्ते सहभागी होत आहेत. सध्या तेलंगाणात असलेल्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातीलही नेतेही सहभागी होत आहेत. त्याच धर्तीर महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊतही सहभागी झाले होते. मात्र त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्यामुळे सध्या ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. नितीन राऊत यांच्या उजव्या डोळ्याला, हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह त्यांची अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे.
भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या आणि सध्या गंभीर जखमी असलेले माजी मंत्री नितीन राऊत यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, मी भारत जोडो यात्रेत सहभागी झालो होतो. चारमिनारवरील कार्यक्रम करुन मंचावर जात असतानाच राहुल गांधी यांचा ताफा आला.
त्याचवेळी बंदोबस्तासाठी असलेले पोलिसांनी घाबरुन त्यांनी मला धक्का दिला. त्यामुळे पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेडसवरच पडलो. त्यामुळे माझ्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
भारत जोडो यात्रेत अनेक सेलिब्रेटीही सहभागी होत असून आता पूजा भट्टही सहभागी झाली आहे. पूजा भट्ट यांनी राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडोो यात्रेत सहभाग घेऊन त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
त्यानंतर त्यांचे अनेक फोटो काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केले गेले आहेत. भारत जोडो यात्रा तेलंगाणानंतर हैदराबादला पोहचली आहे.
कन्याकुमारीपासून सुरु झालेली ही भारत जोडो यात्रा काश्मिरपर्यंत जाणार आहे. या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी क्रीडा, उद्योग, आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेकांबरोबर संवाद साधणार आहेत. तेलंगाणातील मंदिर, मस्जिदांना भेटी देऊन पूजाही करणार आहेत.