अस्सल लोककलावंत ‘भारूडरत्न’ निरंजन भाकरे यांचं निधन

समस्त महाराष्ट्रात 'भारूडरत्न' अशी ओळख असलेले प्रसिद्ध लोककलावंत निरंजन भाकरे यांचे आज (23 एप्रिल) निधन झाले. (bharudkar bharud ratna niranjan bhakre died)

अस्सल लोककलावंत 'भारूडरत्न' निरंजन भाकरे यांचं निधन
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 11:47 PM

औरंगाबाद : समस्त महाराष्ट्रात ‘भारूडरत्न’ अशी ओळख असलेले प्रसिद्ध लोककलावंत निरंजन भाकरे (bharudkar Niranjan Bhakre) यांचे आज (23 एप्रिल) निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर औरंगाबादेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर लोककलेची मोठी परंपरा पुढे घेऊन जाणारा एक बहुआयामी चेहरा हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा सून नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. (Bharudkar Bharud ratna Niranjan Bhakre died recently due to Corona virus infection)

भारुडंला आयुष्य समर्पित केलेला लोककलावंत 

महाराष्ट्राला समृद्ध असा लोककलेचा वारसा लाभला आहे. हा वारसा पुढे घेऊण जाण्याचं काम मराठवाड्याचे अस्सल लोककलावंत निरंजन भाकरे यांनी केले. भारुड या लोककलेला त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य अर्पण केले होते.  एकनाथ महाराज यांची भारूडं आधुनिक काळात लोकांच्या ओठांवर आणणारे लोककलावंत म्हणून निरंजन भारकरे यांची ओळख आहे.

सोंगी भारुडमुळे प्रसिद्ध

निरंजन भाकरे यांनी लोककलेच्या माध्यमातून शेवटपर्यंत जनजागृती करण्याचे काम केले. त्यांनी व्यवनमुक्तीची पहाट हा कार्यंक्रम किक्येक वर्षे केला. त्यांच्या या कार्यक्रमामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. तसेच अनेक टिव्ही शो आणि वेरुळ अजिंठा महोत्वसामध्ये त्यांनी हिरिरीने सहभाग घेतलेला आहे. भरुडमधील सोंगी भारूड या प्रकारमुळे त्यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित झाले. त्यांनी सादर केलेलं ‘बये तुला बुरगुंडा होईल गं’ हे भारुड तर आजही कित्येकजण आवडीने पाहतात.

सामाजिक भान जपणारा गुणी लोककलावंत हरपला- अमित देशमुख

भारुड या लोककलेला देश-विदेशात ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ भारुडकार निरंजन भाकरे यांच्या निधनामुळे सामाजिक भान जपणारा गुणी लोककलावंत हरपला”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी भाकरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

“ग्रामीण भागातील, सामान्य कुटुंबातील या अस्सल कलाकाराने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भारुड सादरीकरणामुळे सर्वांच्या मनात घर केले होते. भारुड आणि इतर लोककलांचे जतन आणि संवर्धन व्हावे, म्हणून त्यांनी कायम पुढाकार घेतला. त्यांचे काम रसिकांच्या कायम स्मरणात राहील”, असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

बुरगुंडा होईलमुळे राज्यभर प्रसिद्ध

महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक लोककलावंत होऊन गेले. मात्र, भाकरे यांचे लोककलेतील काम कायम अजरमार राहील असेच आहे. त्यांच्या बये तुला गुरगुंडा होईल गं, हे भारुड अजूनही अनेकांचा तोंडावर आहे. त्यांच्या भारुड सादरीकरणामुळे त्यांना संपूर्ण मराष्ट्रात ओळख मिळाली होती. त्यांना लोककलेचा हा वारसा आपल्या परिवाराकडून मिळाला होता. हा वरसा नंतर त्यांनी संपूर्ण हयातभर जपला.

निरंजन भाकरे यांचे ‘बुरगुंडा होईल’ हे सुप्रसिद्ध भारुड, पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

Video | नारंगी साडीतील शालूचा काळ्या रानात जलवा; चाहते म्हणतायत ‘हळू चाल काटा रुतेल गं…’

दिवसा शाळा, रात्री गायनपार्ट्या, लतादीदींनीही कौतुक केलेली ही गायिका माहीत आहे का?

‘पापा’ सैफसह शेतात काम करतोय चिमुकला तैमूर, करीनाने शेअर केले खास फोटो!

(Bharudkar Bharud ratna Niranjan Bhakre died recently due to Corona virus infection)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.