माझ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, भास्कर जाधवांनी नितेश राणेंच्या टीकेवर काय म्हंटलं ?
भास्कर जाधव यांनी नितेश राणेंच्या टिकेला फार बुद्धिमान माणसांच्या टीकेला माझ्याकडून उत्तर अपेक्षित करू नका असे म्हणत एका वाक्यामध्ये प्रत्युत्तर दिले आहे.
मनोज लेले, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी : भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मिळालेल्या निवडणूक चिन्हावर खिल्ली उडवली होती. उद्धव ठाकरे यांना मिळालेले चिन्ह हे मशाल नसून ते आईसक्रीमचा कोण असल्याचे म्हंटले होते. त्यावर भास्कर जाधवांनी (Bhaskar Jadhav) नितेश राणेंना एका वाक्यात उत्तर प्रत्युत्तर दिले आहे. फार बुद्धिमान माणसांच्या टीकेला माझ्याकडून उत्तर अपेक्षित करू नका असे म्हणत नितेश राणे यांच्या मशाल या निशाणीच्या चिन्हावर केलेल्या टीकेला भास्कर जाधवांनी उत्तर दिले आहे. याशिवाय जाधव यांनी राष्ट्रपती यांची मी नक्कल केलेली नाही आणि नक्कल केली म्हणून कोणी सिद्ध करू शकणार नाही असे म्हणत ही नक्कल असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे असा दावा ही त्यांनी केला आहे.
त्यापुढे जाधव म्हणाले मी नक्कल किरीट सोमय्या यांची नक्कल केली, त्यामुळे कळत नकळत पणे किरीट सोमय्या यांची तुलना राष्ट्रपती यांच्याशी केली जातेय.
देशाच्या राष्ट्रपती यांचं नाव घेणे काही गुन्हा आहे का ? असाही सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे.
गुन्हा दाखल करणारेच राष्ट्रपतींचा अवमान करतात असे म्हणून भास्कर जाधवांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
यानंतर त्यांनी नितेश राणेंच्या टिकेला फार बुद्धिमान माणसांच्या टीकेला माझ्याकडून उत्तर अपेक्षित करू नका असे म्हणत एका वाक्यामध्ये प्रत्युत्तर दिले आहे.
नितेश राणे यांनी मशाल चिन्हावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे हा थंड माणूस आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाने आईसक्रीमचा कोण दिला असल्याची टीका केली होती.
या टीकेवर भास्कर जाधव यांनी राणेंवर बोलणं टाळल्याचे दिसून येत आहे. याशिवाय किरीट सोमय्या यांची नक्कल केली होती असे सांगत राष्ट्रपती यांची नक्कल केल्याचे स्पष्टीकरण जाधव यांनी दिले आहे.