Bhiwandi building Collapse | भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, 10 जणांचा मृत्यू

भिवंडी शहरात एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. (Bhiwandi building collapse Update)

Bhiwandi building Collapse | भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, 10 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Sep 21, 2020 | 4:02 PM

भिवंडी : भिवंडी शहरात एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर NDRF आणि अग्निशमन दलाकडून तातडीने बचावकार्य सुरु आहे.  दरम्यान या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये दिले जातील, अशी घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. (Bhiwandi building collapse Update)

मिळालेल्या माहितानुसार, भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड या परिसरातील जिलानी इमारत कोसळली. पहाटे 3.40 च्या सुमारात ही दुर्घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी ही सर्व दुर्घटना घडल्याने अनेक नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीत 25 कुटुंब वास्तव्यास होते.

या दुर्घटनेनंतर NDRF आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. आतापर्यंत जवळपास 14-15 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर अद्याप इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये दिले जातील. तर जखमी झालेल्या नागरिकांचा खर्च शासन उचलेल असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

पटेल कंपाऊंड येथील ही इमारत सुमारे 30 वर्षे जुनी एल टाइपमधील होती. या इमारतीला महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केले होते. या इमारतीस दोन वेळा नोटीसही बजावण्यात आली होती. तरीही अनेक नागरिक या ठिकाणी राहत होते. या इमारतीचा एक भाग पूर्ण कोसळला असून दोन मजले हे जमिनीखाली गाडले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Bhiwandi building collapse Update)

संबंधित बातम्या : 

Mahad Building Collapse | 35 जणांचे प्राण वाचवताना दोन पाय गमावले, महाडच्या नावेदला शिवसेनेकडून 2 लाखांची मदत

महाड दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.