स्वतःला रिचार्ज कसे करावे, माणूस जुन्याचा नवा कसा होतो; भुजबळांनी सांगितला चिरतारुण्याचा फंडा

नांदूर मधमेश्वर अभयारण्यात आयोजित पक्षी महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भुजबळ म्हणाले, पर्यटनामुळे अर्थचक्राला गती मिळते. त्यामुळे नाशिकमध्ये येणारे पर्यटक जास्त दिवस थांबावे यादृष्टीने पर्यटनाचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

स्वतःला रिचार्ज कसे करावे, माणूस जुन्याचा नवा कसा होतो; भुजबळांनी सांगितला चिरतारुण्याचा फंडा
नाशिकमध्ये आपल्या शायराना अंदाजात बोलून छगन भुजबळांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 1:04 PM

नाशिकः आत आपुल्या झरा झुळझुळे निळा-निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद. मंगेश पाडगावकरांच्या या ओळी कवितेत ठीक आहेत. मात्र, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कधी काय प्रसंग येईल याचा नेम नसतो. अनेकदा आपण सारे काही संपले आहे, अशा टोकाच्या विचारापर्यंत येऊन हातपाय गाळून बसतो. पण यातही उमेद मिळवता येते. आशेचे चार किरण शोधता येतात. ते कसे याचे उत्तर दिले नाशिक (Nashik) जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी. भुजबळांनी आपल्या उणापुऱ्या आयुष्यात अनेक सुख-दुःखाचे पावसाळे पाहिले. अजूनही ते तसेच ताजेतवाने, उत्साही दिसतात. या चिरतारुण्याचा त्यांनी काय अफलातून फंडा सांगितला ते जाणून घेऊयात.

अन् माणूस जुन्याचा नवा…

नांदूर मधमेश्वर अभयारण्यात आयोजित पक्षी महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भुजबळ म्हणाले, पर्यटनामुळे अर्थचक्राला गती मिळते. त्यामुळे नाशिकमध्ये येणारे पर्यटक जास्त दिवस थांबावे यादृष्टीने पर्यटनाचा विकास करावा. पर्यटनाचा विकास करताना सार्वजनिक बांधकाम विभागाची साथ फार महत्वाची आहे. पर्यटनाने माणूस जुन्याचा नवा होतो. त्यामुळे आयुष्याचे काही क्षण पर्यटनाला देऊन स्वतःला रिचार्ज करा, असे आवाहन त्यांनी केले. छायाचित्र बक्षीस वितरणाचा संदर्भ देत ते म्हणाले, एक छायाचित्र तुमच्या मनातील अनेक प्रश्नांचे उत्तर असते. ते वादळही निर्माण करते आणि मनाला शांतता सुद्धा देते. त्यामुळे छायाचित्राला अधिक महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.

हातावर टॅटू ही काढून घेतला

भुजबळ पुढे म्हणाले, जिल्ह्यात येणारा एक पर्यटक 80 लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करून अर्थचक्राला गती द्यावी. रामसर दर्जा मिळालेले महाराष्ट्रातील नांदूरमधमेश्वर व लोणार हे दोन पर्यटन स्थळे आहेत. जगभरातील प्रदूषणाची हानी पक्ष्याच्या अधिवसाला बसत आहे. त्यामुळे हजारो किलोमीटचा प्रवास करून हे पक्षी नांदूमध्यमेशर येथे येत असून त्यांचे संवर्धन करायला हवे. पक्षांचे संरक्षण करतांना डॉ. सलीम अली यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमापूर्वी छगन भुजबळ यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. तसेच इकोफ्रेंडली टॅटू आपल्या हातावर काढून घेतले.

स्पर्धकांचा बक्षीसांनी गौरव

वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रथम पारितोषिक डॉ. जयंत फुलकर, द्वितीय चारुहास कुलकर्णी, तृतीय ओंकार चव्हाण व उत्तेजनार्थ रोशन पोटे व विशेष पारितोषिक आनंद बोरा यांचा सन्मान करण्यात आला. छायाचित्र स्पर्धेचे परिक्षक ज्येष्ठ छायाचित्रकार शिरीष क्षीरसागर आणि चित्रकला स्पर्धेचे परीक्षक अनिल अभंगे यांचाही सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड, निफाडच्या प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे, सहायक वनसंरक्षक विक्रम अहिरे, डॉ. सुजित नेवसे, वनक्षेत्र अधिकारी शेखर देवकर, चापडगाव वन समितीच्या अध्यक्ष सुनीता दराडे उपस्थित होते.

इतर बातम्याः

ऐतिहासिक नाशिकला स्मार्ट सिटीचा चूड; गोदाघाट उद्धवस्त करून मंदिरे तोडली, आंदोलन पेटणार!

युक्रेनमधले 16 विद्यार्थी सुखरूप परतले; नाशिककरांच्या आनंदाला पारावार नाही, वाजत-गाजत स्वागत!

अर्थमंत्री विरुद्ध ऊर्जामंत्री वादाचा 2 लाख 50 हजार उद्योजकांना फटका, या अधिवेशनात तरी तोडगा निघणार का?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.