पैसे भरले सावकारेंनी, गाडी गेली परबांच्या नावे, नव्या गाडीचा ‘सेंकड ओनर आमदार’
जळगाव : भुसावळचे (Bhusawal) भाजपा (BJP) आमदार संजय सावकारे (MLA Sanjay Saavkare) यांची कार परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर परस्पर हस्तांतरित झाल्यानंतर आता ती गाडी पुन्हा परिवहन कार्यालयानेच आमदार सावकारेंच्या नावावर करून दिली आहे. मात्र, या व्यवहारांमुळे नवी कार असूनही आमदार सावकारे त्या कारचे ‘सेकंड ओनर’ झाले आहेत. या प्रकरणी परिवहन विभागातील चार अधिकाऱ्यांसह इतर […]
जळगाव : भुसावळचे (Bhusawal) भाजपा (BJP) आमदार संजय सावकारे (MLA Sanjay Saavkare) यांची कार परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर परस्पर हस्तांतरित झाल्यानंतर आता ती गाडी पुन्हा परिवहन कार्यालयानेच आमदार सावकारेंच्या नावावर करून दिली आहे. मात्र, या व्यवहारांमुळे नवी कार असूनही आमदार सावकारे त्या कारचे ‘सेकंड ओनर’ झाले आहेत. या प्रकरणी परिवहन विभागातील चार अधिकाऱ्यांसह इतर तीन एजंटांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. तसेच वाहन परस्पर सावकारे यांच्या नावे करताना मात्र त्यांना कोणताही ओटीपी आलेला नाही. त्यामुळे कोणतेही वाहन एखादा अधिकारी अथवा नेता आपल्या मर्जीप्रमाणे कोणाच्याही नावावर करू शकतो हेच असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होत आहे. तर या प्रकारामुळे परिवहन विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
कोणतीही शहानिशा नाही
आमदार संजय सावकारे यांची कार २८ डिसेंबर रोजी परस्पर अनिल परब यांच्या नावे करण्यात आली होती. त्यासाठी ऑनलाइन पोर्टलवरून प्राथमिक प्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी खात्री करण्यासाठी पाठवला जाणारा पासवर्ड मिळवण्यासाठी अशोक पाटील या आरटीओ एजंटचा मोबाइल क्रमांक वापरला गेला. प्रत्यक्षात तयार झालेली कागदपत्रे जळगाव परिवहन कार्यालयातून कोणतीही शहानिशा न करता मंजूर करण्यात आली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी परिवहन विभागातील चार अधिकाऱ्यांसह इतर तीन एजंट वर कारवाई देखील करण्यात आली
परिवहन विभागाच्या गलथान कारभार
तर वाहन पुन्हा परस्पर ट्रान्सफर करताना सावकारे यांना कोणताही ओटीपी आला नाही. त्यांना काहीही कळवले गेले नाही. ट्रान्सफरबाबतही सावकारे कुटुंबीय अनभिज्ञच होते. मात्र या सदर प्रकारांमुळे परिवहन विभागाचा गलथान कारभाराचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. म्हणजे कोणतेही वाहन एखादा अधिकारी अथवा नेता आपल्या मर्जीप्रमाणे वाहन कोणाच्या नावावर करायचे किंवा परस्पर कोणाच्या नावे करायचे हे आता सहज शक्य असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे परिवहन विभागाच्या गलथान व भ्रष्ट कारभारामुळे एखादा मोठा अनुचित प्रकार घडला त्या जवाबदार कोण असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.