वयाच्या या टप्प्यावर… भूषण देसाई याच्या पक्षप्रवेशावर सुभाष देसाई यांची मोठी प्रतिक्रिया

भूषण देसाई याच्या या पक्ष प्रवेशावर सुभाष देसाई यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे.

वयाच्या या टप्प्यावर... भूषण देसाई याच्या पक्षप्रवेशावर सुभाष देसाई यांची मोठी प्रतिक्रिया
SHUBHASH DESAIImage Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 8:48 PM

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशानंतर भूषण देसाई याने मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे याची कल्पना सुभाष देसाई यांना दिली होती. तसेच, शिंदे यांची काम करण्याची पद्धत आवडल्यामुळेच शिवसेनेत प्रवेश केला, असे स्पष्ट केले. भूषण देसाई यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश हा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, भूषण देसाई यांचे वडील आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भूषण देसाई याने बाळासाहेब आणि शिवसेना हेच माझे दैवत आहे. हिंदुत्वाचा विचार आणि राज्यासाठी साहेबांनी जे स्वप्न पाहिले. ते आज एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे आणि आम्ही आधीपासूनच एकत्र काम केले आहे. त्यांच्या कामाचा वेग, निर्णय क्षमता आणि सर्वसामान्य जनतेला त्यांच्या कारभार पहायला मिळतो तो मी जवळून अनुभवला आहे. त्यामुळेच मी त्यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला, असे भूषण देसाई म्हणाले.

मात्र, भूषण देसाई याच्या या पक्ष प्रवेशावर सुभाष देसाई यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही.

शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र, इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे, असे सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.