लंडनला पळून गेलेला निरव मोदी कर्जतमध्ये? मंत्री म्हणतात, तो तोच असेल तर…

कर्जत येथे होणाऱ्या एमआयडीसीच्या जागेची भूनिवड समितीने पाहणी केली आहे. पंरतु, इथे पाणीपुरवठा करण्याबाबत जलसंपदा विभागाने निर्णय घेतलेला नाही. अन्य काही बाबींचीही पूर्तता करायची असून येत्या तीन महिन्यांत याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

लंडनला पळून गेलेला निरव मोदी कर्जतमध्ये? मंत्री म्हणतात, तो तोच असेल तर...
ROHIT PAWAR VS RAM SHINDE
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 8:45 PM

मुंबई । 27 जुलै 2023 : विधानसभेचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे माजी मंत्री, विधान परिषदेतील आमदार राम शिंदे यांच्यातले सख्खे वैर महाराष्ट्राला काही नवीन नाही. कोणत्या ना कोणत्या कारणावरून या दोघांमध्ये वार पलटवार सुरूच असतात. विधानसभेचे आमदार रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी सुरू होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याला सरकारनेही प्रतिसाद दिला. मात्र, त्यावरून आमदार राम शिंदे यांची विधान परिषदेत प्रश्न विचारून रोहित पवार यांची कोंडी केली. तर, उद्योग मंत्री यांनी चौकशीचे आदेश देत रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ केली.

विधान परिषदेत आमदार राम शिंदे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड एमआयडीसीचा मुद्दा त्यांनी लक्षवेधीद्वारे विचारला. सत्यजित तांबे, सचिन अहीर, शशिकांत शिंदे या चर्चेत सहभागी झाले होते. कर्जत तालुक्यात गुंतवणूकदारांनी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात विकत घेतल्या. नीरव मोदी, मनिषा कासोले, नयन गणेश अग्रवाल, कमलेश शाह, पंकज विनोद खन्ना, गणेश अग्रवाल अशी नावे वाचून दाखवत लंडनमध्ये पळून गेलेला निरव मोदी याचे नाव यात असल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा

एमआयडीसी ही गुंतवणूकदार यांच्यासाठी करायची आहे की शेतकरी, बेरोजगार यांच्यासाठी करायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी सुरू होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पंरतु, एमआयडीसीला मिळणारी जमीन नीरव मोदी यांची असल्याचा थेट आरोप आमदार राम शिंदे केला.

आमदार राम शिंदे यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली. त्याला उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, कर्जतला एमआयडीसी करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. पण, आता तुमच्या आरोपामुळे नीरव मोदी याने येथे जमीन घेतल्याचे समोर आले. मात्र, येथे जमीन घेतलेला हा नीरव मोदी लंडनला पळून गेलेला फरार नीरव मोदी आहे की स्थानिक आहे याची माहिती घेतली जाईल. तसेच, सर्व नावांची सखोल चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.