विधानसभा निवडणुकीत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला, राणेंच्या विरोधासह पक्षांतर्गत गटबाजीचं आव्हान

जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. केसरकर यांना घेरण्यासाठी राणेंच्या स्वाभिमान पक्षासह सर्वच विरोधी पक्ष एकवटण्याची शक्यता आहे. सावंतवाडी नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता असूनही त्यांचे खंदे समर्थक समजले जाणारे बबन साळगावकर हे देखील केसरकर यांच्याविरोधी आघाडीत दाखल झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला, राणेंच्या विरोधासह पक्षांतर्गत गटबाजीचं आव्हान
Follow us
| Updated on: Aug 20, 2019 | 4:41 PM

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. केसरकर यांना घेरण्यासाठी राणेंच्या स्वाभिमान पक्षासह सर्वच विरोधी पक्ष एकवटण्याची शक्यता आहे. सावंतवाडी नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता असूनही त्यांचे खंदे समर्थक समजले जाणारे बबन साळगावकर हे देखील केसरकर यांच्याविरोधी आघाडीत दाखल झाले आहेत. त्यामुळे केसरकर यांच्या समोरचं आव्हान वाढणार आहे. त्यातच भाजपचे राजन तेली यांनीही सावंतवाडी मतदारसंघावर दावा केल्याने राजकीय समीकरणं बदलली आहेत.

मागील निवडणुकीतील राणे विरुद्ध केसरकर वादाचा अंक या निवडणुकीतही पहायला मिळणार आहे. त्याची सुरुवातही सध्या सुरू झाली आहे. केसरकर यांच्या विरोधात जे जे असतील त्यांची मोट बांधण्यास राणेंकडून सुरुवात झाली आहे. त्याचाच प्रत्यय सध्या येतोय. केसरकर यांचे खंदे समर्थक आणि सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर हे शिवसेनेत असूनही केसरकर विरोधी आघाडीत सहभागी झालेत. त्यांनी जाहीर भाषणातून केसरकर यांचीच लक्तरे काढण्यास सुरुवात केलीय. त्यातच भाजपही केसरकर यांची कोंडी करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. दुसरीकडे हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे. राष्ट्रवादीने यावेळी केसरकर यांच्याविरोधात तगडा उमेदवार देऊन नवे-जुने सर्व हिशेब पूर्ण करण्याचा चंग बांधलाय.

आपण कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा विकासासाठी आणला असे दावे केसरकर यांच्याकडून केले जात आहेत. मात्र, विरोधक हे मान्य करण्यास तयार नाहीत. केसरकरांना भाजपच्या गटाचाही विरोध आहे. तशा भाजपच्या गुप्त बैठकाही होत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप एकमेकांच्या विरोधात लढूनही दीपक केसरकर तब्बल 41 हजार मताधिक्याने विजयी झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र, भाजपसोबत युती असूनही शिवसेनेला केवळ 29 हजार एवढं मताधिक्य मिळालं आहे. त्यांच्या मताधिक्यात जवळपास 12 हजार मतांची कपात झाली आहे. त्यामुळे साहजिकच केसरकर यांच्यासमोर मोठं आव्हान असेल.

आगामी निवडणुकीत भाजपचे राजन तेली वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास केसरकरांसमोर राजन तेली हे मोठं आव्हान निर्माण करतील. त्यामुळे केसरकर यांना विजयासाठी नक्कीच कसरत करावी लागणार आहे. सावंतवाडी मतदारसंघात दोनदा निवडून आलेला आमदार तिसऱ्यांदा निवडून येत नाही हा इतिहास गृहराज्यमंत्री दिपक केसरकर पुसून टाकणार का हेही पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.