मोठी बातमी | केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, ऊस खरेदी दरात 8 टक्क्यांनी वाढ

पंजाब, हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या अंतर्गत उसाच्या रास्त आणि फायदेशीर भावात (FRP) सुमारे 8% वाढ करण्यात आली आहे.

मोठी बातमी | केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, ऊस खरेदी दरात 8 टक्क्यांनी वाढ
PM NARENDRA MODIImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Feb 21, 2024 | 11:41 PM

नवी दिल्ली | 21 फेब्रुवारी 2024 : पंजाब आणि हरियाणा राज्यांच्या शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. पोलिसांनी शेतकऱ्यांना सीमेवरच अडवले आहे. पण, शेतकरी दिल्लीला जाण्यासाठी ठाम आहेत. याच दरम्यान केंद्र सरकारने रात्री उशिरा एक मोठी घोषणा केली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याची माहिती देताना सांगितले की, सरकारने शेतकऱ्यांना फायदा मिळावा यासाठी ऊस खरेदीच्या दरात 8 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे उसाच्या भावात प्रतिक्विंटल 25 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या उसाची खरेदी किंमत 315 रुपये प्रति क्विंटल आहे. या निर्णयामुळे ती आता 340 रुपये होईल.

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, ‘मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. याअंतर्गत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उसाचा खरेदी दर निश्चित करण्याचा पहिला निर्णय घेण्यात आला आहे. उसाची खरेदी किंमत म्हणजे एफआरपी ₹ 340 प्रति क्विंटल करण्यात आली आहे. जी पूर्वी ₹ 315 प्रति क्विंटल होती.

पंजाब आणि हरियाणा या राज्याच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, आंदोलक शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन करत बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांची पोलिसांसोबत जोरदार चकमक झाली. या घटनेत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर, 25 जण जखमी झाले आहेत. तर, 12 पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या योजनेला दोन दिवस ब्रेक लावला, पुढील रणनीतीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारपर्यंतची वेळ निश्चित केली आहे.

शेतकरी आंदोलनात या घडामोडी घडत असतानाच मोदी सरकारने कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती देताना सांगितले की, मोदी सरकारने शेतकऱ्यांचे हित नेहमीच सर्वोच्च ठेवले आहे. प्रत्येक वेळी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलली. ऊस खरेदीच्या दरात 8 टक्के वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्रिमंडळाने साखर हंगाम 2024-25 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी साखर कारखानदारांनी देय असलेल्या उसाच्या ‘वाजवी आणि लाभदायक किंमत’ (FRP) ला मंजुरी दिली आहे. उसाची एफआरपी 315 रुपये प्रतिक्विंटलवरून 340 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे. म्हणजे उसाच्या भावात क्विंटलमागे 25 रुपयांनी वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.