Big news for jail inmates : येरवडा कारागृहातील कैद्यासाठी मोठी बातमी; 50 हजार रुपयांच्या कर्जासाठी 223 कैद्यांनी केला अर्ज
शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कर्ज घेता यावे यासाठी राज्य शासन प्रयत्न करत होते त्याला आता यश आले असून महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँक कडून कर्ज कैद्यांना मिळणार आहे.
मुंबई: विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी (Prisoners) दिलासादायक बातमी आहे. शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाही बँकेकडून आता कर्ज मिळणार आहे. या कर्जाचा उपयोग हा कैद्याच्या मुलाचे शिक्षण, लग्न आणि अन्य महत्त्वाच्या कामासाठी कर्ज घेता येणार आहे. त्याप्रमाणे तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने (Thackeray government) घेतला होता. सुरुवातीला पुण्याच्या येरवाडा कारागृहात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार असून तुरुंगातील कामांसाठी मिळणाऱ्या बंदीवेतनाच्या आधारावर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक कैद्यांना कर्जपुरवठा करणार आहे. तर या योजनेच्या माध्यमातून कैद्यांना 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज (Loan) मिळणार आहे. तसेच हे कर्ज मोठी शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या नातेवाईकांना घेता येणार आहे. त्यामुळे हा निर्णय कैद्यांच्या नातेवाईकांना दिलासा दायक ठरणार आहे.
बँकेकडून आता कर्ज मिळणार
शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाही बँकेकडून आता कर्ज मिळणार आहे. या कर्जाचा उपयोग हा कैद्याच्या मुलाचे शिक्षण, लग्न आणि अन्य महत्त्वाच्या कामासाठी होऊ शकतो. कारागृहात कैदी करत असलेल्या कामाच्या वेतनातून या कर्जाचे हफ्ते फेडण्यात येणार आहे. कैद्यांना कर्ज मिळावे यासाठी राज्य सरकारच्या वतीने द टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेससोबत करार करण्यात येणार होता. तसेच यासाठी कराराला गृह मंत्रालयाकडून परवानगीही देण्यात आली होती. मात्र आता मोठी शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँक कर्ज देणार आहे. तसेच बँक कैद्यांना 50 हजार रुपयांच घावटी कर्ज देणार आहे.
मुलांच्या शिक्षणासाठी, वकिलाची फी
शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कर्ज घेता यावे यासाठी राज्य शासन प्रयत्न करत होते त्याला आता यश आले असून महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँक कडून कर्ज कैद्यांना मिळणार आहे. तर कर्ज देण्यास बँकेला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. हे कर्ज कैद्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी, वकिलाची फी भरण्यासाठी घेता येणार आहे. तर कैद्यांच्या श्नमातून मिळालेल्या वेतनातून बँक परतफेड करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच याबाबत महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँकेचे चेअरमन विद्याधर अनास्कर यांची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी हे कर्ज मिळवे म्हणून 223 कैद्यांनी अर्ज केल्याचेही सांगितले आहे.