बीड जिल्ह्यातल्या सौंदाना येथील सरपंचाचा अपघात की घातपात? पहिल्यांदाच समोर आली मोठी बातमी
बीड जिल्ह्यातल्या सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर याच्या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यभरात गाजत असतानाच आता बीडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बीडमध्ये आणखी एक सरपंचाचा मृत्यू झाला आहे. अभिमन्यू क्षीरसागर असं या सरपंचांचे नाव असून, ते परळी तालुक्यातील सौंदाना गावचे सरपंच आहे. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं त्यांना उडवल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी परळी तालुक्यातल्या मिरवड फाट्यावर घडला. दुचाकीवरून जात असताना त्यांना टिप्परनं उडवलं. दरम्यान हा अपघात होता? की घातपात अशी चर्चा सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे.
अभिमन्यू क्षीरसागर याच्या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर येथील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आता समोर आल्या आहेत. हा घातपात नसून अपघातच आहे. अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी दिली आहे.
परळी तालुक्यातील सौंदाना येथील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिली . या अपघातात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकाला तत्काळ अटक करावी अशी मागणी ग्रामस्थ व नातेवाईकांनी केली आहे. शिरसागर यांचे कोणाशीही वैर नव्हते सर्वांशी मिळून मिसळून वागणारे ते सरपंच होते. त्यामुळे यात कुठलाही घातपात झाल्याचा संशय आम्हाला नसल्याचं ग्रामस्थानी सांगितलं.
काल रात्री परळीकडे येत असताना टीप्परची त्यांना धडक बसली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि एफआयआरची नोंदणी केली. कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. त्यांची कोणाशीही दुश्मी नव्हती, त्यामुळे घातपाताचा प्रश्नच नाही. त्यांचे सर्वांशी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते, असंही यावेळी ग्रामस्थानी म्हटलं आहे. त्यामुळे आता सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या अपघातानंतर घातपाताच्या चर्चेला जे उधाण आलं होतं, त्याला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.