मोठी बातमी : अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, आणखी 14 आमदार होणार मंत्री

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी शिंदे गटाच्या सहा आणि भाजच्या सहा मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी नऊ अशा एकूण 18 आमदारांना मंत्रपदाची शपथ देण्यात आली होती.

मोठी बातमी : अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, आणखी 14 आमदार होणार मंत्री
DEVENDRA FADNAVIS AND EKNATH SHINDEImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 12:02 AM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा आणखी विस्तार होणार आहे. येत्या 17 जुलैपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होत आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात शिंदे यांच्या शिवसेनेतील काही नाराज आमदारांची तसेच भाजपच्या वरिष्ठ आमदारांची मंत्रीपदी वर्णी लावण्यात येणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी शिंदे गटाच्या सहा आणि भाजच्या सहा मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी नऊ अशा एकूण 18 आमदारांना मंत्रपदाची शपथ देण्यात आली होती. त्यामुळे शिंदे सरकारमध्ये मंत्र्यांची एकूण संख्या 30 झाली होती. त्यामुळे रिक्त पदावर आपली वर्णी लावण्यासाठी अनेक आमदारांनी फिल्डिंग लावली होती. अखेर, त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अनेक दिवस रखडला होता. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ आणि त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

याचवेळी शिंदे गटातील आमदार आणि भाजपचे आमदार यांना मंत्रिपदाची शपथ देण्याची तयारी करण्यात आली होती. त्यानंतर सकाळीच दोन्ही पक्षांनी काही महत्त्वाच्या आमदारांची आणि मंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.

भाजपकडून जयकुमार रावल, संजय कुटे, संभाजी पाटील निलंगेकर, देवयानी फरांदे, नितेश राणे यांची नावे चर्चेत आहेत. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात 14 आमदार शपथ घेणार आहेत. या आमदारांनाही आजच मंत्रपदाची शपथ देण्यात येणार होती. मात्र, आज त्यांचा शपथविधी होऊ शकला नाही. त्यामुळे येत्या 10 जुलैला उर्वरित मंत्रीमंडळ विस्तार होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.