भाजपला आणखी एक मोठा झटका, माजी आमदार करणार रामराम; ‘या’ पक्षात जाणार

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडे येणारा नेत्यांचा ओघ आता कमी झाला असून भाजपकडून इतर पक्षात जाणााऱ्यांचा ओघ वाढल्याचं दिसत आहे. गेल्या आठवड्याभरात भाजपच्या दोन मातब्बर नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे आणि लातूरचे भाजपचे माजी आमदार विनायकराव पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपचा आणखी एक माजी आमदार पक्षाला सोडण्याची शक्यता आहे.

भाजपला आणखी एक मोठा झटका, माजी आमदार करणार रामराम; 'या' पक्षात जाणार
भाजपला आणखी एक मोठा झटका
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 12:00 PM

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठं अपयश सहन करावं लागल्याने भाजपला धक्क्यावर धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी काही नगरसेवकांसोबत ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचा भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला. पण राजू शिंदे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे संभाजीनगरमध्ये भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. हा मोठा झटका बसलेला असतानाच भाजपला आणखी एक दुसरा मोठा धक्का बसणार आहे. मराठवाड्यातीलच भाजपच्या माजी आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या माजी आमदाराने शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून प्रवेशाची तारीखही ठरली आहे.

भाजपाचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. भालेराव हे येत्या 11 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. सुधाकर भालेराव हे उदगीरमधील मोठं प्रस्थ आहे. लातूर जिल्ह्यात त्यांचा मोठा दबदबा आहे. त्यांनी पक्ष सोडल्याने त्याचं भाजपला मोठं नुकसान होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बनसोडेंना ताप

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात सुधाकर भालेराव हे शरदचंद्र पवार पक्षातून अर्थात महाविकास आघाडीतून उदगीर विधानसभा मतदारसंघात मैदानात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उदगीरमध्ये संजय बनसोडे यांना मोठं तगडं आव्हान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लातूरमध्ये ताकद वाढली

यापूर्वी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर या मतदारसंघातील भाजपाचे माजी आमदार विनायकराव पाटील यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षामध्ये झालेला आहे. लातूर जिल्ह्यात भाजपाचे दोन माजी आमदार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यात शरद पवार गटाची ताकद वाढताना दिसत आहे. शरद पवार गटाने मराठवाड्याकडे अधिक लक्ष केंद्रीत केल्याचंही यातून दिसत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.