लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, ‘या’ 6 गोष्टी असेल तरच… अन्यथा पैसे मिळणं कठिणच ? पटापट चेक करा

सोमवारी हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला, त्यावेळी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी दिली. अधिवशेनाच्या पहिल्यात दिवशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनासठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, 'या' 6 गोष्टी असेल तरच... अन्यथा पैसे मिळणं कठिणच ? पटापट चेक करा
लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेटImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 17, 2024 | 11:20 AM

विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला घवघवीत यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा बजावणाऱ्या लाडकी बहीण योजनेबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे. काल ( सोमवारी) हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला, त्यावेळी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी दिली. अधिवशेनाच्या पहिल्यात दिवशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनासठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तर अन्नपूर्णा योजनेसाठी – 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद झाल्याने आता या योजनेचा पुढील हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे.

जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली होती. त्यानुसार 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. जुलैपासून नोव्हेंबर पर्यंत, 5 महिन्यांचे एकूण 7500 रुपये आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता आधीच जमा करण्यात आला होता. म्हणजेत ऑक्टोबरमध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण 3 हजार रुपये जमा झाले.

2100 रुपये कधी मिळणार ?

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे महायुतीने या योजनेची घोषणा केली तेव्हापासून महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होत आहेत. मात्र राज्यात पुन्हा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्याने महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. याबाबत अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केली जाईल, ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

मात्र, त्याआधीच लाडकी बहीण योजनेची परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. कारण या योजनेसाठी सादर केलेल्या अर्जांची सरकारकडून पुन्हा तपासणी केली जाणार आहे.या पुनर्तपासणीमध्ये किंवा फेरपडताळणीमध्ये ज्या महिला अपात्र आढळतील, त्यांचे अर्ज रद्द केले जातील.

लाडकी बहीण योजेनसाठी पात्रता काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

या फेरपडताळणीत अपात्र आढळलेल्या महिलांचे अर्ज रद्द केले जातील. दरम्यान, आज आपण लाडकी बहिन योजनेची पात्रता जाणून घेणार आहोत. तुमच्याकडे खाली नमूद केलेल्या 6 गोष्टी असल्यास, तुमचा फॉर्म आता नाकारला जाईल. या 6 गोष्टी असतील तर तुमचा फॉर्म आता रिजेक्ट केला जाऊ शकतो.

लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता :

– 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. मातर ज्या महिलांचे किंवा त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

– ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर सोडून चारचाकी वाहन असेल त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

– ज्या कुटुंबातील सदस्य शासकीय विभागात कायमस्वरूपी किंवा कंत्राटी तत्त्वावर नोकरी करतात अशा कुटुंबातील महिलांनाही हा लाभ मिळणार नाही. अशा कुटुंबातील महिलांनी या योजनेसाठी अर्ज केल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल.

– ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत अशा कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

– संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

– ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक कर भरत असतील तर त्या कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.